कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून 3 अल्पवयीन मुले ताब्यात; दीड लाख रूपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत

Karad News 56 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा दिवसांपूर्वी चोरलेल्या तीन दुचाकी चोरट्यास अटक करण्यात यश आले आहे. पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत गेल्या … Read more

टेंभू योजनेच्या व्हॉल्व्ह चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Crime News 20240121 071127 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील टेंभू धरणावरून चोरीस गेलेले अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्हची चोरी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बापूराव रघुनाथ मदने (वय ३६, रा. टेंभू, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील महत्वाच्या योजनापैकी एक असलेल्या टेंभू … Read more

केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत युवकास 90 हजारास घातला गंडा

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

चोरटयांनी 40 हजाराच्या बांधकाम साहित्यावर मारला डल्ला

karad taluka police station

कराड प्रतिनिधी । सध्या कराड व पाटण तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून कुठे घरफोडी तर कुठे लुटमारीचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान आता चोरटयांनी आपला मोर्चा हा रस्त्याच्या बांधकाम साहित्याच्या चोरीकडे वळवला आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील सुर्ली येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातून सुमारे 40 हजार रुपये … Read more

हॉटेलवरील भांडणावरून ‘त्यांनी’ रचला खुनाचा कट; मात्र, पोलिसांनी उधळून लावला डाव

Crime News Karad 2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात गत आठवड्यात घरफोडी, मारामारी आणि लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर पोलिसांकडून कारवाई होते न होते तोवर कराड पंचायत समितीच्या माजी उपसभापतीच्या मुलाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींचा अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरुन झालेला वादाचे रूपांतर थेट खुनाचा कट … Read more

कोळेवाडीत 32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

karad taluka police station

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कोळेवाडी येथील एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. तेजपाल अशोक पोतेकर (वय 32, रा. कोळेवाडी) असे संबंधित युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोळेवाडी येथील ‘पन्हाळी’ नावाच्या ओढ्याकडेला तेजपाल पोतेकर याने ओढ्याकडेला झाडास गळफास घेऊन युवकाने … Read more

बोगस विवाह लावून घातला 4 लाख 25 हजाराचा गंडा; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Karad Taluka Police Station

कराड प्रतिनिधी । विवाह होत नसल्याने विवाह इच्छुक तरुण वधुवर सूचक केंद्रात जाऊन आपले नाव देतात. त्याठिकाणी ठराविक पैसे भरून आपले बायोडाटा देतात. मात्र, त्यातील काहींचे विवाह होतात तर काहींचे राहतात. मात्र, अशामध्ये काहींची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशीच फसवणूक झाल्याची घटना कराड तालुक्यात घडली असून वधुवर सूचक असल्याचे सांगत विवाहासाठी दोन युवकांकडून 4 लाख … Read more