कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून; ‘अजिंक्यतारा’च्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

Ajinkyatara News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कराड तालुक्यात भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याच्याही घटना घडली आहे. सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पाऊस … Read more

सातारा-कराड मार्गावर बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशरची भीषण धडक; अपघातात सहाजण जखमी

Karad News 37

कराड प्रतिनिधी । सातारा ते कराड मार्गावर गोटे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बॅन्जो पार्टीचा टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

शेतकऱ्यांची शेतीपंपाची सरसकट वीजबिल माफी करावी; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

Karad News 20240702 165559 0000

कराड प्रतिनिधी | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला,यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्यशासनाने आश्वासन दिले आहे,तसेच ७.५० साडेसात अश्व शक्ती पर्यंतची थकीत वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले आहे.मात्र राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीजबिल माफी ची मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवाजी पाटील, निवासराव … Read more

वसंतगडला डोरेमॉनसह छोट्या भीमने केले विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

Karad News 23

कराड प्रतिनिधी । जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांची पाहिली घंटा शनिवारपासून वाजण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कराड तालुक्यात तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रतीकात्मक डोरेमॉनसह छोटा भीम, मिली माउस अवतरले होते. कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गणोजी माने हायस्कूलमध्ये देखील नवीन … Read more

Khodshi Dam : कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण झाले ओव्हरफ्लो

Khodshi Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून ओढे- नाले पूर्णक्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दरम्यान, कराड-पाटण तालुक्यातही दोन दिवसात पावसाने चांगली हजेरी लावली असून कराडजवळ असलेल्या कृष्णा नदीवरील (Krishna River) ब्रिटिशकालीन खोडशी धरण (Khodshi Dam) पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ … Read more

जिल्ह्याला पावसाने झोडपले; दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी; पिके भुईसपाट तर घरावरील पत्र्यांची भिंगरी

Satara News 20240609 072409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस कोसळला. तर पूर्व दुष्काळी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात कोरेगाव, कराड तालुक्यात देखील पिकांचे व दुकानांचे नुकसान झाले. कोरेगाव तर दुकानावरील पत्रे भिंग्रीसारखे उडून गेले. तर वादळी … Read more

सुट्टीवर आलेल्या कार्वे गावचे जवान अमोल थोरात यांचा अपघाती मृत्यू

Crime News 6

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र व भारत तिब्बत सिमा पोलीस दलातील जवान अमोल प्रल्हाद थोरात (वय ३२) या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कार्वे गावावर शोककळा पसरली आहे. जवान अमोल थोरात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

रखरखत्या उन्हात ‘त्यांनी’ काढला हक्काच्या घरकुलासाठी कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित कुटुंबाना घरकुल मिळनेबाबत तसेच घरकुलाच्या अनुदान मागणीसाठी आज घरकुल संघर्ष समितीच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रखरखत्या उन्हात कराड तालुक्यातील नागरिक, महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

कराड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन

Karad News 75 jpg

कराड प्रतिनिधी । विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ती पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

हिंगनोळेत मादी बिबट्या अन् पिल्लांचे वन विभागाकडून पुनर्मिलन; पुनर्मिलनाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद

Karad News 73 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील शेतकरी सौ. विद्या निवासराव माने यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी (दि. 18) दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत आढळून आली होती. या घटनेची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच घटनस्थळी जाऊन त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी … Read more

चोरीस गेलेल्या स्टील चोरीचा गुन्हा 3 तासांत उघड; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 24 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कालेटेक येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टीलची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. अखेर चोरट्यास अटक करण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे 3 … Read more