कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील BLO कडून आदेशाचा भंग; कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Karad Crime News 20241113 200240 0000

कराड प्रतिनिधी | २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एका बीएलओ यांनी मतदार ओळखचिठ्या ताब्यात न घेता त्या वाटप करण्यासाठी पर्यवेक्षकांनी दिलेल्या आदेशाचा भंग केला आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. श्रीमती तेजस्विनी ऋषिकेश कुंभार (रा. पाटण … Read more

कराड दक्षिणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान मशीनच्या सुरक्षिततेबाबत माहिती

Karad News 11

कराड प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज कराड दक्षिण मतदार संघात रिंगणात असलेल्या सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृतरित्या नियुक्त प्रतिनिधीनी स्ट्रॉंगरूमला भेट दिली. आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निरीक्षक गीता ए, व निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम सील व त्यांच्या कडेकोट बंदोबस्तातील सुरक्षिततेबाबत आवश्यक ती सर्व माहिती … Read more

साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

कराड दक्षिणेत मान सन्मान मिळेपर्यंत कोणाच्याही स्टेजवर जायचं नाही; अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ठरलं

Karad News 20241027 093728 0000

कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. अशात सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कराड दक्षिणेतील महायुतीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले तसेच … Read more

कराड दक्षिणसाठी चौथ्या दिवशी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज; 5 नामनिर्देशन पत्रांची विक्री

Karad News 5 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरुवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज शुक्रवारी चौथ्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून विद्याधर कृष्णा गायकवाड यांनी तर गणेश शिवाजी कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 … Read more

साताऱ्यात विद्यमान आमदार अन् इच्छुकांमध्ये काटे कि टक्कर; संभाव्य लढती पहाच

Satara Political News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल काल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू झाली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात जशी महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे तशीच जिल्ह्यात देखील होणार हे नक्की. निवडणुकीचं बिगुल … Read more

‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

Karad News 78

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली … Read more