कराडातील अंतर्गत वाहतुक मार्गात आज आणि उद्या तात्पुरता बदल; नेमकं कारण काय?

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुरवण्यात येणाऱ्या मतदान यंत्र साहित्य वाटपाचे काम आज सुरु झाले आहे. या दोन्ही मतदार संघातील स्ट्रॉगरूम/ मतदान पेट्या मुख्य केंद्र परिसर मार्गात निवडणूक कर्मचारी, मतदान अधिकार, मतदान पेट्या, यंत्र, साहित्य यांच्या वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदानसाठीचे केंद्रनिहाय साहित्य तयार

Karad News 20241118 221512 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासच उरले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारसाठीच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्यानंतर आता मिशन वोटिंगची सर्वत्र घाई सुरू झाली असून २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने मतदानासाठी लागणारे साहित्य मतदान केंद्रनिहाय तयार ठेवण्यात आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात स्ट्रॉंगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व बॅलेट … Read more

कराड दक्षिणमधील मलकापूरसह वडगाव हवेलीत ‘पिंक बूथ’ केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ठरतील : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे

Karad News 40

कराड प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघात १९३ मलकापूर व ३२१ वडगाव हवेली येथे ‘ पिंक बूथ ’ उभारण्यात येणार असून ही दोन्ही मतदान केंद्रे  सर्व महिला अधिकारी व कर्मचारी चालवतील, त्यांच्या उत्कृष्ट कामकाजाने ही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ( मॉडेल बूथ सेंटर) ठरतील असा विश्वास २६० कराड दक्षिण चे निवडणूक निर्णय … Read more

आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी; अतुल म्हेत्रे यांचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांना निर्देश

Karad News 31

कराड प्रतिनिधी । आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वप्रथम सर्वांनी काळजी घ्यावी. दरम्यान मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचारी यांची असेल आदी निर्देश कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पोलीस पाटील व ग्रामसेवक, तलाठी यांना दिले. महाराष्ट्र … Read more

राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे (BJP) महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेतून थेट खासदार शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “कर्नाटक, हिमाचल … Read more

कराड दक्षिणेतला हनुमान अन् मतदारराजा कोणत्या ‘बाबा’ला पावणार?

Political News 9

कराड प्रतिनिधी । राजकीय पटलावर प्रचारामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते. मात्र, काही परंपराही राजकारण्यांकडून पाळल्या जातात. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी जवळपास सर्वच मतदार संघात उमेदवारांचे प्रचाराच्या शुभारंभाचे नारळ फुटले आहेत. मात्र, या मतदार संघातील सर्वात महत्वाच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात सध्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले … Read more

कराडात विधानसभेसाठी नियुक्त सर्व सूक्ष्म निरीक्षकांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण उत्साहात

Satara News 36

कराड प्रतिनिधी । 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक कराड तहसील कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक गीता ए, सहाय्यक निवडणूक निरीक्षक राहुल घनवट, कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीमधून 12 उमेदवारांची माघार; आठ जण निवडणूक रिंगणात

Karad News 21

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. दरम्यान, आठ विधानसभा मतदार संघातही सर्वात महत्वाची मानली जाणारी कराड दक्षिण विधानसभा … Read more

निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांनी घेतला कराड दक्षिण मतदार संघाचा आढावा

Karad News 15

कराड प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज मंगळवारी २६०, कराड दक्षिण मतदार संघास निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांनी भेट दिली. यावेळी विविध विभागांची पाहणी केल्यानंतर गीता ए यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्रीमती गीता ए यांनी … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांस मशीन हाताळणी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी ३ व ४ यांचे पहिले प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे नुकतेच पार पडले. यावेळी निवडणूकीदरम्यान काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत तसेच बीयु, सीयु, व्हीव्हीपॅट मशीन बाबत तपशीलवार माहिती दिली. प्रशिक्षण वर्गास कराड दक्षिण निवडणूक … Read more

कराडला पार पडले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण

Karad News 7 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण टाऊन हॉल कराड येथे आज पार पडले. यावेळी प्रशिक्षण कालावधीत जे नियुक्त कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. कराड येथे आज पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गास … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराडदक्षिणमधून ‘या’ नेत्यानं केली उमेदवारीची मागणी

Karad News 20240922 114237 0000

कराड प्रतिनिधी | खासदार शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शरद पवार यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने महत्वाचा मानला जात असून या दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून माजी … Read more