कराड दक्षिणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सहा मतदान केंद्राच्या टीमचा सन्मान

Karad News 46

कराड प्रतिनिधी । 260, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 बुथपैकी सर्व कामकाज आटोपून सर्व मतदान साहित्य जमा करण्यासाठी शासकीय धान्य गोदाम कराड येथे दाखल झालेल्या पहिल्या ६ मतदान केंद्रांचा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या सर्व टीमनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

IMG 20241116 WA0002

कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रे आम्ही तळ हातातील फोडाप्रमाणे जपली आहेत. 19 तारखेला एसटीतून मतदान केंद्रावर जाताना ती आमच्याप्रमाणे तुम्हीपण जपा तरच मतदानादिवशी ती आपल्याला जपतील अशी विनोदनिर्मिती करून मतदान मशीन्स जिवाप्रमाणे जपा व सुस्थितीत न्या, अशा सूचना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केल्या. 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी बाहेरील … Read more

कराड उत्तर अन् दक्षिणेतील आठवडा बाजार यात्रा, जत्रा मतदानाच्या दिवशी राहणार बंद

Karad News 23

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडण्यासाठी, मतदान केंद्रावरील होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर आठवडा बाजार जत्रा/यात्रा याचा परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार व यात्रा/जत्रा २० नोव्हेंबर रोजी … Read more

जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरंगी तर 2 मतदारसंघांत तिरंगी सामना; बंडखोरांमुळे चुरस वाढली

Satara News 31

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांत पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आलेले आहेत, तर काही ठिकाणी नवीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. तरीही ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच होणार आहे. त्यातच काही मतदारसंघांत बंडखोरीही झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे गणित बदलण्याचीही शक्यता आहे. आठही विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल झाले असून, … Read more

कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून केली मतदान जागृती; विधानसभेला मतदान करण्याचे आवाहन

Voting Awareness News

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मधील 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सुनील परीट, पथक कर्मचारी आनंदराव जानुगडे, संतोष डांगे, ऋषिकेश पोटे, सचिन चव्हाण यांनी कमी मतदान झालेल्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये मतदान जागृती केली. मतदान करणे हे आपले … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत दोघांचे तर कराड उत्तरमध्ये 1 अर्ज अवैध

Karad News 19

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केली होती. दरम्यान, उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीमध्ये हमीद रहीम शेख व सुवर्णसिंह शंकरराव पाटील या २ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांकडून 31 नामनिर्देशनपत्रे दाखल … Read more

कराड उत्तरमधून 31 तर दक्षिणमधून 28 अर्ज दाखल; अर्ज माघारीची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत

Karad News 16

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवसा अखेर कराड उत्तरमधून २८ उमेदवारांनी ३१ तर दक्षिणमधून २२ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी असून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर २८ उमेदवारांनी ३१ … Read more

कराड दक्षिणेतून पृथ्वीराज बाबांनी साधेपणाने तर उत्तरेतून मनोज घोरपडेंनी वाजत गाजत भरला अर्ज

Karad News 20241028 131744 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

कराड दक्षिणेत मान सन्मान मिळेपर्यंत कोणाच्याही स्टेजवर जायचं नाही; अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ठरलं

Karad News 20241027 093728 0000

कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. अशात सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कराड दक्षिणेतील महायुतीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले तसेच … Read more

कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

Karad News 20241024 133204 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुरेश भोसले, … Read more

कराडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली ड्रगिस्ट असोसिएशन, वाहतूकदार संघटनाची बैठक; दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Karad News 5

कराड प्रतिनिधी । २६० कराड दक्षिण व २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राज्य उत्पादन शुल्क असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, जड वाहन वाहतूकदार संघटना, सहकारी बँका व पतसंस्था आदी विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज तहसील कार्यालयात यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी … Read more

कराड दक्षिणमध्येच मतदार यादीवर तब्बल 4 हजारांवर हरकती

Karad News 20241011 214553 0000

कराड प्रतिनिधी | निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर आजपासून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, … Read more