पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार; मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील

Karad News 15

कराड प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होत असल्या कारणाने अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयुसीसी) सदस्यांनी तसेच नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य … Read more

मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात; कराडला जंगी स्वागत तर साताऱ्यात निघणार भव्य रॅली

Satara News 32

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढा देणारे मनोज जरांगे-पाटील हे शनिवार, दि. १० रोजी साताऱ्यात आहेत. यानिमित्त साताऱ्यात मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बाँबे रेस्टॉरंट ते गांधी मैदान अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा मार्ग भगवामय करण्यात येणार असून, त्याची तयारी … Read more

टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात 3 वर्षाची चिमुकली ठार

Karad News 14

कराड प्रतिनिधी । टेम्पो पाठीमागे घेताना टेम्पोखाली सापडून अवघ्या तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराडच्या कार्वे नाका येथे घडली. स्वरा नितीन शिंदे (वय ३) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस … Read more

लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल

Karad News 13

कराड प्रतिनिधी । लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल तर सचिवपदी अविनाश भिसे आणि खजिनदारपदी सुप्रीम तावरे यांची निवड करण्यात आली आहे. 58 वर्षाची परंपरा असलेला कराड लायन्स हा सर्वात जुना क्लब आहे. लायन्स क्लब कराडचा कायमस्वरूपी प्रकल्प असलेल्या आर. के. लाहोटी लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक रुग्णावर मोफत डोळे शस्त्रक्रिया करण्यात … Read more

काँग्रेसच्या तासवडे टोलनाक्यावरील टोलविरोधी आंदोलनाला यश; 100 टक्के टोल माफीचे NHAI कडून पत्र

Karad News 12

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना 100 टक्के टोल माफी करण्यात आली … Read more

“पैसा जनतेचा, मोदी-गडकरींच्या खिशातील नाही”; पृथ्वीराज बाबांचा हल्लाबोल; काँग्रेसचे कराडच्या तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

Congress News 1

कराड प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व वाहने टोल न घेता सोडून दिली. प्रशासनाने टोलबाबत ठोस भूमिका घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

‘सातारा झेडपीत नोकरी लावतो,’ सांगत ‘त्यांनी’ तिघांना लावला चुना; चरेगावच्या संशयित दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 6

सातारा प्रतिनिधी । “सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामाला लावतो”, असे सांगून जिल्ह्यातील ३ युवकांची सुमारे ६ लाख रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश संभाजी कोळी (वय ३०) व अमित अशोक माने (वय ३३, दोघे रा. चरेगाव, ता.कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऋषीकेश धनाजी न … Read more

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Koyna News 20240803 080837 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more

कराडला 150 ट्रॅक्टरची निघाली भव्य रॅली; चौका चौकात एक मराठा लाख मराठाचा जयघोष

Karad News 20240803 073033 0000

कराड प्रतिनिधी | मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लढणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी सगसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसह मराठा समाजावरील अन्याया विरोधात कराड शहरात शुक्रवारी मराठा समाज बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे 150 ट्रॅक्टर सहभागी करण्यात आले होते. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही रॅली समाप्त करण्यात आली. याच रॅलीचा … Read more

इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक; 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Karad News 20240802 215851 0000

कराड प्रतिनिधी | दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरूषी मिश्रा हिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी संशयितास दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा, असं त्याचं नाव आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर तरुणीला दिलं ढकलून … Read more

कराड बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश पाटील यांची निवड

Prakash Patil News 20240802 171920 0000

कराड प्रतिनिधी | कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार … Read more

कराड, शिरवळमधील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांवर कारवाई, सहाजण दोन वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240802 124430 0000

सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. … Read more