इर्शाळवाडीहून NDRF ची टीम थेट कराडात दाखल

NDRF Team Karad News

कराड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळ गडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली. या ठिकाणचे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर NDRF ची टीम आज बुधवारी दुपारी 3 वाजता कराडात दाखल झाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली … Read more

कराड तालुक्यात 3 बिबट्यांची दहशत; रात्रीस ‘या’ गावात वावर

3 Leopards Agai Karad News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात रात्रीच्यावेळी अगोदरच चोरट्यांकडून धुमाकूळ घेतला जात असताना आता तालुक्यात तब्बल 3 बिबटे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ठीक 1 वाजून 34 मिनिटांनी रस्त्यावरून जात असलेली या बिबट्यांची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. याबाबत अधिक माहिती की, कराड तालुक्यातील वराडे गाव … Read more

कराडात कारगिल शौर्य दिन साजरा; विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

Kargil Valor Day is celebrated in Karad News

कराड प्रतिनिधी । 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धामध्ये भारताने विजय संपादन केले. या विजयाप्रित्यर्थ हा दिवस ‘कारगिल शौर्य दिन’ म्हणून कराड येथे साजरा केला जातो. आज बुधवारी सकाळी येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय दिवस चौकात असणाऱ्या विजयस्तंभाला मान्यवरांच्या हस्ते … Read more

कराड उत्तरमधील प्रत्येक ZP गटात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर देणार : श्रीरंग चव्हाण

Srirang Chavan News

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या कराड उत्तर मतदार संघात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन मजबूत करून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकताच कराड उत्तर विधानसभा मतदार … Read more

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा ‘त्या’ सुवर्ण क्षणांचा व्हिडिओ अखेर 71 वर्षांनंतर जगासमोर !

KhashabaJadhav

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवहेलसिंकी येथे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला 1952 साली कांस्यपदक मिळवून दिले. त्यावेळी करण्यात आलेल्या पदक वितरण समारंभाची चित्रफीत 71 वर्षांनी जागतिक ऑलिम्पिक संघटनेने नुकतीच प्रसारित केली आहे. कराड तालुक्यातील गोळेश्वर गाव असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने सुरू होणाऱ्या कुस्ती संकुलाचे काम … Read more

कराड उत्तरेत आम्हीच विकासकामे मंजूर केल्याची काहींकडून वल्गना; बाळासाहेब पाटलांची BJP नेत्यांवर टीका

Balasaheb Patil News

कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांच्या मतदार संघातील प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप नेत्यांकडून अनेक विकास कामे आम्हीच मंजूर करून आणल्याचे सांगितले गेले असल्याने यावर आमदार बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप … Read more

सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पाऊस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Heavy Rains News

कराड प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडलयामुळे परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच भातखाचरेही भरून गेली आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला असून सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. … Read more

शरद पवारांकडून केंद्रीय शिक्षण आयोगाच्या PGI (2.0) अहवालाचा आढावा; राज्यातील शिक्षणाबाबत केलं महत्वाचं विधान

PGI 2.0 Repor Sharad Pawar News

कराड प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० म्हणजे पी.जी.आय. अहवाल प्रसिद्ध केला होता. यात महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आज पवारांनी मुंबईत केंद्रीय शिक्षण आयोगाच्या PGI (2.0)अहवालाबाबत महत्वाची … Read more

कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांना डॉ. अतुल भोसलेंच्या हस्ते सुरक्षा संचाचे वितरण

Dr. Atul Bhosale News

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले जाते. कोयना वसाहत, ता. कराड येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे 128 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या सुरक्षा संच पेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की देश उभारणीत … Read more

कराड हद्दीत गोवा बनावटीचा 20 लाखांचा मद्यसाठा पकडला; दोघांना अटक

Goa made liquor seized in Karad

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान कराड येथील उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कराड हद्दीत गोवा बनावटीचा तब्बल 20 लाखांचा मद्यसाठा पकडला असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त … Read more

ढेबेवाडी मार्गावरील ‘या’ फरशी पुलानजीक पडलंय भलंमोठं भगदाड; होतेय धोकादायक वाहतूक

Dhebewadi Road Dangerous Traffic News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाल्यामुळे दुर्गम भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खचत आहेत. त्यामुळे रस्त्यानं भगदाड पडून अपघातही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ढेबेवाडी विभागातील मालदन बस थांबा ते पाचपुतेवाडी या सुमारे 1 किलोमीटर अंतराचा रस्ता ढेबेवाडी विभाग व काळगाव विभागाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर जाधववाडी फाट्या जवळील ओढ्यावर नवीन साकव पुलाचे … Read more

2 लाखांची 4 गावठी बनावटीची पिस्तूली जप्त; कराडच्या दोघांना अटक

Karad police News

कराड प्रतिनिधी | शिरपूर पोलिसांनी गुरूवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये कराड तालुक्यातील दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतूसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. … Read more