कऱ्हाडला राज्यस्तरीय अधिवेशनात मराठा समाजाला ‘ओबीसी’त समाविष्ट करण्यासह 5 ठराव

Maratha Community Karad

कराड प्रतिनिधी । कराड तालुका सकल मराठा समाजाचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी मराठा समाजाचे आरक्षणामध्ये 50 टक्के मर्यादेत राहून मराठा समाजाला ओबीसी यादीत क्रमांक वाढवून किंवा कुणबीची मराठा तत्सम जात घोषित करून ओबीसी यादीत समावेश करण्यात यावा, मराठा समाजाला ओबीसी दाखले द्यावेत, यासह पाच महत्वाचे ठराव राज्यस्तरीय मराठा समाजाच्या अधिवेशनात मांडण्यात आले. कराड … Read more

कराडात चोरट्यांनी फोडले प्रसार माध्यमांचे कार्यालय; तब्बल इतकी रक्कम केली लंपास

karad crime

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांकडून घडफोडीचे प्रकार केले जात आहेत. आता चोरट्यांनी काही कार्यालयांकडे आपला मोर्चा वळवला असून त्यांनी कराड शहरातील एका प्रसार माध्यमाचे कार्यालय फोडून सुमारे 50 हजाराचे साहित्य तसेच रोकड लंपास केल्याची घटना शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रकाश काशिनाथ पिसाळ (रा.कार्वे, ता. कराड) यांनी … Read more

कृष्णा सरिता बझारच्या चेअरमनपदी स्नेहल राजहंस तर व्हाईस चेअरमनपदी संगिता शेटे

Krishna Sarita Bazaar News

कराड प्रतिनिधी । मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील कृष्णा सरिता बझारच्या चेअरमन पदी स्नेहल मकरंद राजहंस यांची व व्हाईस चेअरमन पदी संगिता संजय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी य. मो. … Read more

‘इंद्रधनुच्या’वतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेंभू येथे आदरांजली

karad journalist Tembhu Gopal Ganesh Agarkar

कराड प्रतिनिधी । थोर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कराड तालुक्यातील टेंभू या त्यांच्या जन्मगावी असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील टेंभू (ता.कराड) गावचे सुपुत्र, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य, विधवा … Read more

चोरी केलेली दुचाकी विकायला गेला अन पोलिसांच्या हाताला लागला; कराड पोलिसांची कारवाई

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । चोरी केलेली दुचाकी विकताना एकास अटक करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने सापळा लावून अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सुनिल श्रीपती गावडे (वय 35) रा. येलुर ता. वाळवा जि.सांगली असे अटक केलेल्या युवकाचे … Read more

कराड शहरातील नागरिकांनो पाणी जपून वापरा !

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून उद्या शनिवारी जल शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या निवळण टाकीची स्वच्छता केली … Read more

सहकार मंत्र्यांनी काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिलेय; मनोज घोरपडेंची आ. बाळासाहेब पाटलांवर टीका

Manoj Ghorpade BJP Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी । गेली 25 वर्षे झाली हणबरवाडी, धनगरवाडी योजना रखडवण्यात आली होती आमी आताच्या सरकारच्या काळात ती रखडल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक या योजनेचे काम पूर्ण होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे आलो. आता योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याने काही दिवसांमध्ये याची चाचणी होणार आहे. योजना अपूर्ण … Read more

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : प्राचार्य राजेंद्र पाटील

Rajendra Patil Principal of Government Technical College Karad

कराड प्रतिनिधी । दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेक कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी धावाधाव केली जात आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज https://poly23.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचा आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सुविधा … Read more

सातारा जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Satara reservation draw program

कराड प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत बाकी होती. दरम्यान, राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता ज्या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकाला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय

कराड प्रतिनिधी । कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने काल एकास सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. संतोष शिवाजी बागल (वय 26, रा. मलकापूर, ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाने दिलेल्या … Read more

भरधाव कंटेनरने रस्ता ओलंडणाऱ्या महिलेस चिरडले

Container Accident News

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते मलकापूर हद्दीत सध्या पूल पाडण्यात आला असून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सारखी वर्दळ राहत आहे. मलकापूर शहराच्या हद्दीतीलहॉटेल धनी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली. अपघातात ठार … Read more

टक्केवारीचे आमिष दाखवत केली 50 लाखांची फसवणूक; 3 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police Station

कराड प्रतिनिधी । कराड शहरात फसवणुकीच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीही एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना ४ टक्के परतावा मिळतो असे सांगत तिघा जणांनी अनेक जणांची तब्बल 50 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात तिघा जनावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या … Read more