शहराच्या मध्यवर्ती भागात चालायचा गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा गोरख धंदा; पोलीस, महसूल विभागाने छापा मारून केला पर्दाफाश

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान, या छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस व महसूल विभागास माहिती मिळाली. त्यानंतर येथील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी आज पहाटे पाच … Read more

कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत … Read more

4 राज्यांमध्ये तपास करून चोरीला गेलेले सव्वा दोन लाखांचे मोबाईल केले हस्तगत; ‘कराड गुन्हे प्रकटीकरण’ची धडाकेबाज कामगिरी

Karad Police News 20231010 090617 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं गहाळ झालेल्या तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या 15 मोबाईलचा यशस्वी शोध घेऊन ते मूळ मालकांना परत मिळवून दिलेत. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या गहाळ मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश या चार या राज्यातून शोध घेऊन ते परत देण्याच्या कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांच्या निकटवर्तीय उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

Balasaheb Patil News 2 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील हजारमाचीचे उपसरपंच तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रशांत यादव यांच्याविरोधात तहसिलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास दर्शक ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंचांसह 14 सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव आणला आहे. हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. हजारमाची ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 14 सदस्यांनी नुकतीच कराडचे … Read more

कोयना वसाहत येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान कामाचे भूमिपूजन उत्साहात

Koyna Colony News jpg

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येणार आहे. या नियोजित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कोयना वसाहत येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, गावाच्या … Read more

बाजार समितीच्या भिंतीचा वाद; कराड व्यापारी असोशिएशनने दिला ‘हा’ इशारा

Karad Agricultural Produce Market Committee News

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संरक्षण भिंतीवरून न्यायालयाकडून आलेल्या आदेशानंतर पालिकेने नुकतीच कारवाई केली. दरम्यान, कराड मार्केट यार्ड मर्चंट असोशिएनच्यावतीने शेती उत्पन्न बाजार समितीला हा रस्ता खुला केल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत एक निवेदन देण्यात आले आले आहे. संबंधित खुला केलेला रस्ता हा तत्काळ बंद करण्यात यावा. जोपर्यंत रस्ता बंद केला जात नाही … Read more

केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत युवकास 90 हजारास घातला गंडा

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

कराडात ‘समता पर्व’च्या उपोषणास मुस्लिम समाज बांधवांकडून पाठिंबा; आज प्रकाश आंबेडकर देणार भेट

20231007 094547 0000 jpg

कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणस्थळी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी भेट देत पाठींबा दर्शवला. तसेच प्रशासनास निवेदन देखील दिले. राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण मुस्लिम बांधवांना द्यावे, … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला

Balasaheb Patil News 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आ. बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि. 18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगिती दिली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत आदेश दिलेला होता. राज्य सरकारने नुकताच महाविकास … Read more

Karad News : ‘काही दिवस थांबा, सगळं शांत झाल्यावर तुमचं काम होईल’; पोलिसांचा संशयितांना ‘प्रशंसनीय’ सल्ला!

Karad Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात झालेल्या लूटमारीच्या गुन्ह्यात ज्या मालाची लूट झाली. नेमके तेच दडवून भलताच मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आणण्याची चतुराई उंब्रज पोलिसांनी दाखवलीय. तरी देखील ‘प्रशंसनीय’ कामगिरी केल्याचं सर्टिफिकेट वरिष्ठांनी देऊन टाकल्यामुळे सगळेच या प्रशंसनीय कामात वाटेकरी होऊ पाहत असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘हॅलो महाराष्ट्र’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामुळे पोलीस दलात … Read more

कराडात समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणात एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; उपोषणकर्ते आक्रमक

Karad News 9 jpg

कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणस्थळी आज गुरुवारी एक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. यावेळी उपोषणकर्त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपोषणकर्त्यांच्या उपचाराकडे येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिरंगाई केली जात आहे. … Read more

मलकापूर नगरपरिषदेच्या रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा; ‘ते’ शॉप बंद करण्यासाठी रहिवाशांचे निवेदन

Malakapur News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा डंका वाजवणाऱ्या मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरी वस्तीत सुरू असलेल्या एका मोटर वाइंडिंगच्या शॉपच्या वाहनांमुळे पाईप लिकेज होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ते मोटर वाइंडिंगचे शॉप बंद करण्यासाठी शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. मलकापूरात राहत असलेल्या स्थानिक … Read more