कराड दक्षिणेतील महत्वाच्या ‘या’ प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’!

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । येवती – म्हासोली मध्यम प्रकल्पातून कराड दक्षिणमधील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरित करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात होती. भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असता, त्यांनी या महत्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका…

Karad Leopard News 20231202 131745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गमेवाडी येथील एका विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वन विभागाकडून बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी … Read more

मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू; मनसेचा आंदोलनाचा इशारा

Karad MNS News jpg

कराड प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ८ दिवसांत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे स्टाइलने खळखटयाक आंदोलन करू, असा इशारा कराड येथील मनसे नेत्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे नुकताच देण्यात … Read more

कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात लांब लचक ग्रेडेन अन् कमी उंचीची शिजू डॉग…

Karad News 20231127 190453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. दरम्यान यंदा प्रदर्शन अजून एक दिवस वाढवण्यात आलेले आहे. प्रदर्शनात चौथ्या दिवशी फळे, फुले आणि श्वान स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत दाखल झालेल्या श्वानांनी सर्वांचे लक्ष … Read more

2 टनाचा गजेंद्र रेडा अन् 3 फूट उंचीची पुंगूर गाय…

IMG 20231126 WA0018 jpg

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी जनावरांची स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला तो 2 टनाचा गजेंद्र रेडा आणि तीन ते साडे तीन फूट उंचीची बुटकी गाय. … Read more

अजितदादा-आनंदराव नानांची भेट, मग चर्चा तर होणारच!

Karad News 20231125 235928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कराड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आनंदराव नानांनी पुण्यात अजितदादांची भेट घेतली होती. नाना लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे आज दादा आणि नानांच्या … Read more

बचत गटांसोबत शेतकऱ्यांचा मालास मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Karad News 20231125 194249 0000 jpg

कराड प्रतिनिधी | नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. कराड येथील शेती उत्पन्न्न बाजार … Read more

विक्रीसाठी आलेले गावठी बनावटीचे 2 पिस्तूल जप्त, एकास अटक

Karad Crime News 20231125 075613 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दादा उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

Karad News 20231122 172818 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शेणोली, ता. कराड येथील ग्रामपंचायत सरपंचावर बुधवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय पवार यांनी मंगळवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली आहे. सरपंचाविरोधात तहसीलदार विजय पवार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे की, सरपंच जयवंत बजरंग कणसे हे मनमानी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून काम … Read more

ऊस दरासाठी रयत क्रांती संघटना शुक्रवारी करणार आंदोलन : सचिन नलवडे

Karad News 20231122 164023 0000 jpg

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ … Read more

कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’वर कार्यशाळा उत्साहात

Karad News 12 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभागाच्यावतीने ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी : अनफोल्डिंग मल्टिट्यूड ऑफ ड्रग टार्गेटस्’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे ८७ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या हस्ते … Read more

गावठी कट्टा अन् काडतुसासह 2 तरुणांना LCB कडून अटक

Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथे मसूर फाट्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी एक धाडसी कारवाई केली आहे. या ठिकाणी विक्रीकरण्याच्या उद्देश्याने घेऊन आलेला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन तरुणांना पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सुदर्शन किरण पाटील (वय 19, रा. आटके, ता. कराड) व मिथीलेश मारुती महिंदकर (वय 19, रा. … Read more