स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी नगरपालिका अव्वल

Karad News 20240106 101151 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत 2023 या वर्षात सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दि. 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये पालिकांनी सहभाग घेतला होता. … Read more

माजगावच्या जिल्हा परिषद शाळेत भरला वैज्ञानिकांचा मेळावा

Patan News 20240105 212855 0000 jpg

कराड प्रतिनिधी | थोर शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील जिल्हापरिषद शाळा माजगाव येथे नुकतेच विज्ञानजत्रा व रांगोळी प्रदर्शन या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भविष्यकालीन शिक्षणाचा वेध घेत सध्याच्या संगणक युगातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सक्षम विद्यार्थी तयार व्हावा व प्रत्येक मुलाच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना संधी मिळावी या उद्देशाने … Read more

कोतवालाला मारहाण केली म्हणून कोर्टाकडून एकास सुनावली 90 दिवसांची शिक्षा

Karad News 20240105 133315 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कोतवालाला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी फिरोज गणी मुजावर (रा. पाडळी-केसे, ता. कराड) याला तीन महिने कारावास आणि 2.5 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी ठोठावली. याबाबत माहिती अशी की, कोरोना कालावधीत 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी … Read more

नडशी कॉलनीत आढळली एक बेवारस बॅग

Crime News 20240104 122711 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील नडशी कॉलनीयेथे शिरवडे स्टेशन रस्त्यालगत बुधवारी सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन आलेला एक जण एक बॅग ठेवून कराडच्या दिशेने निघून गेला. ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीती पसरली होती. संशयास्पद आढळून आलेल्या या बॅगेत नेमकं काय आहे? या भीतीने स्थानिक नागरिकांनी याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे … Read more

शिरगावातील मोहिते कुटुंबाने रक्षाविसर्जन, पिंडदान विधीबाबत घेतला मोठा निर्णय

Karad News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरगांव मधील सामाजिक परिवर्तनशील व पुरोगामी विचारसरणी असलेल्या मोहिते कुटुंबाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कुटुंबात दि. ३१ डिसेंबर रोजी मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे सुपुत्र जयंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधीनंतरच्या तिसऱ्या दिवसाचे प्रचलीत संपूर्ण विधी नैवेद्य, पिंडदान, कावळ्याचे स्तोम, मुंडन, आत्मापूजन पौराहित्य आदी कालबाह्य तरीही परंपरेने करण्यात … Read more

कराड – ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा अन्यथा रास्ता – रोको; मनसेचा इशारा

karad News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड-ढेबेवाडी महार्मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा दि. 20 जानेवारी रोजी कोळे बसस्थानक येथे रास्ता-रोको आंदोलन … Read more

शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू; सचिन नलवडेंचा इशारा

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनद्वारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. परंतु टेम्भू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. या कारणाने आज रयत क्रांती संघट्नेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे … Read more

महात्मा गांधी विद्यालय कालेचे शिक्षक किरण कुंभार सर रेखाटणार अयोध्येतील राम मंदिर परिसरात चित्रे

Kiran Kumbhar Ram Temple Ayodhya

सातारा । सध्या संपूर्ण देशात राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिर परिसरात काही चित्रे लावण्यात येणार आहे. ही सर्व चित्रे देशातील २० चित्रकारांकडून रेखाटली जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील … Read more

नरेंद्र मोदी हे देशाला समर्पित आयुष्य देणारे पंतप्रधान : डॉ. भारती पवार

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

Crime News 21 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड … Read more

कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक; 5 लाखांचा माल केला हस्तगत

Crime News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर संबंधित चोरट्यांचा शोध घेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री दोघा चोरट्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली. अखिलेश सूरज नलवडे … Read more

बनावट सोने तारण ठेऊन 39 लाखांचा अपहार, कराडात फायनान्स कंपनीची फसवणूक

Crime News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सध्या अनेक फायनान्स कंपनीकडून लोकांना सोने तारण कर्ज दिले जात आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून व्याज तसेच खर्चाची मासिक हप्प्त्यापोटी ठराविक रक्कम देखील घेतली जात आहे. मात्र, असे करत काही फायनान्स कंपनीकडून फसवणूक देखील होण्याची शक्यता असते. अशीच घटना कराड शहरात घडली आहे. फायनान्स कंपनीत बनावट सोन्यावर कर्ज उचलून तसेच कर्जदारांनी कंपनीत ठेवलेले … Read more