कराडनजीक गोळेश्वर परिसरात आगीत 100 एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 27 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामुळे खोडव्याची आग परिसरात पसरून यामध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त एकर ऊसाचे क्षेत्र जळाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक गोळेश्वर परिसरातील कैकाडा … Read more

कराड तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणारी 7 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240123 195457 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाया ७ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १) शुभम शंकर काकडे, (वय २४, रा. शिवाजीनगर मलकापुर, ता. कराड जि. सातारा) तसेच टोळी सदस्य २) समीर ऊर्फ सॅम नुरमोहंमद मोमीन, (वय २९, रा. मुजावर कॉलनी, ता. कराड जि. सातारा) … Read more

पालच्या यात्रेत चोरटयांनी चार भाविकांचे दागिने केले लंपास

Pal Yatra News 1 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस काळ पार पडला. मात्र, यात्रेत चोरीच्या घटना देखील घडल्या. चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल ३ लाखांचे दागिने गायब करण्यात आले. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाचजणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

कराडची महिला कारसेवक फक्त 200 रूपये घेऊन गेली होती अयोध्येला

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी | अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशात आज जल्लोषाचे आणि भक्तिमय वातावरण असताना कार सेवकांच्या योगदानाचा देखील गौरव करण्यात आला. बाबरी पाडताना कराडमधील १०५ कार सेवक अयोध्येत घटनास्थळी कार सेवा करत होते. त्यापैकी एक असलेल्या विनया खैर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना आज ३० वर्षांपुर्वीच्या त्या घटनेला उजाळा दिला. लहान मुलं घरी ठेऊन … Read more

अल्पवयीन मेव्हण्याच्या खून प्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

Crime News 20240123 073451 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सासुशी असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून व पत्नी हिचे बरोबर असलेल्या वादावरून मेहुणा रणजित उर्फ निरंजन (वय ७ वर्षे ) याच्यावर असलेल्या रागातून त्याचा आगाशिवनगर, दांगटवस्ती येथील डोंगरातील दगडी पायऱ्यांवर आपटून खून केल्याच्या खटल्यात दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आण्णासाहेब पाटील यांनी आरोपी सागर शंकर जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक … Read more

सांबराच्या शिंगांची विक्री करण्यासाठी आले अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Crime News 20240121 191019 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सांबराच्या शिंगांची विक्री व तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना एलसीबी पथकाने सापळा रचून पकडले. पुणे-बंगळुरू महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन आत्माराम जाधव आणि अमोल सुरेश गायकवाड (दोघेही रा. गोसावीवाडी, ता. कराड), अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर … Read more

टेंभू योजनेच्या व्हॉल्व्ह चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Crime News 20240121 071127 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील टेंभू धरणावरून चोरीस गेलेले अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्हची चोरी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बापूराव रघुनाथ मदने (वय ३६, रा. टेंभू, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील महत्वाच्या योजनापैकी एक असलेल्या टेंभू … Read more

सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारले मानवी साखळीतून जय श्री राम अन् धनुष्यबाण

Karad News 20240121 043848 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, कराड मध्ये अयोध्या येथे होत असलेल्या श्री राम मंदिर उद्घाटन व श्री राम प्राण प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या मैदानावर ‘जय श्री राम व धनुष्यबाण’ मानवी साखळीच्या माध्यमातून साकारले. जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अनिल कुलकर्णी, संचालक दीपक कुलकर्णी, स्वाती भागवत यांच्या हस्ते श्री राम … Read more

तडीपार असून देखील कराडात वावरत होता, डीबी पथकाने सापळा रचून संशयिताला केली अटक

Karad News 20240120 200158 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दोन वर्ष तडीपार केले असताना कराडमध्ये प्रवेश करून कोल्हापूर नाका परिसरात छुप्या पद्धतीने वावरताना आढळलेल्या संशयिताला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. आबीद आलम मुजावर (रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड), असे त्याचे नाव आहे. दोन वर्षांसाठी केलं आहे तडीपार आबीद मुजावर हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील … Read more

अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंकडून खा. श्रीनिवास पाटील यांचे सांत्वन

20240120 164558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी सौ. रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीचे नेते, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आदरांजली वाहिली. रजनीदेवी पाटील यांच्या निधनाने खूप दुःख झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्या शक्ती स्तंभ होत्या. त्यांनी कायम सामाजिक कार्यासाठी खा. पाटील यांना प्रेरीत केलं आणि त्यांचा उत्साह … Read more

कालगावच्या ‘कालभैरव’ पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा आ. बाळासाहेब पाटलांच्या हस्ते सत्कार

20240119 120345 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कालगाव बेलवाडी चिंचणीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कालभैरव जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 9/0 असा विजय संपादन केला. सर्व विजयी उमेदवारांनी ग्रामस्थांसमवेत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालय सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे … Read more

कराड – पाटण मार्गावर ट्रक – दुचाकीचा भीषण अपघात

Karad News 20240119 083445 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड-चिपळूण मार्गावर वारूंजी गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. निखील हणमंत जाधव (वय 19, रा. म्होप्रे, ता. कराड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील म्होप्रे येथील युवक निखील जाधव … Read more