14 वर्षांनंतरही कराडच्या ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधवांच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा प्रश्न अधांतरीच

Karad News 5

कराड प्रतिनिधी । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असून त्याची ते उत्तरे देत आहेत. आतापर्यंत अधिवेशनात कराडचा विमानतळ, एसटी बसस्थानक प्रलंबित काम आदींचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र, ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा विषय काही अधिवेशनात उपस्थित केला गेलेला नाही. त्यामुळे 14 वर्षांनंतरही या ऑलिम्पवीराच्या … Read more

कराडातील अलबिक्स हॉटेलच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

Karad Palika News

कराड प्रतिनिधी । कराड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली कि त्यांवर पालिकेच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जाते. कारवाई अगोदर नोटीस देखील दिली जाते. अशी कारवाई आज कराड पालिकेकडून अजंठा ट्रान्सपोर्ट समोरील अलबिक्स हॉटेलवर करण्यात आली. यावेळी जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांच्यावतीने अनधिकृतपणे केलेले बांधकाम तसेच अतिक्रमण हटवण्यात आले. कराड येथील पोपटभाई … Read more

पृथ्वीराजबाबांच्या धमकी प्रकरणाची कायदेशीर चौकशी करा : कराडच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मागणी

Karad Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री नांदेडच्या इसमाकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणी संबंधित इसमास अटक करण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर कराड आणि मलकापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणाची कायदेशीर चौकशी करावी तसेच धमकी देणाऱ्याविरुद्ध कठोर … Read more

महापूराची आपत्ती आल्यास काय करायचं? NDRF च्या जवानांनी दिले कराड पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Karad News 4

कराड प्रतिनिधी । अतिवृष्टी तसेच महापुराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच या काळात बचाव कार्य करण्यासाठी राज्य सरकारची NDRF ची एक टीम कराड येथे या आठवड्यात दाखल झाली आहे. या टीमच्या जवानांच्या वतीने कराड येथील यशवंतराव स्मृती सदन (टाऊन हॉल) मध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती … Read more

सह्याद्री साखर कारखाना हद्दीत सापडला बहेली सापळा

jpg 20230731 095010 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात शिकारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील शहापूर येथील सह्याद्री साखर कारखाना हद्दीत घडली. या ठिकाणी डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा हा रानात गेले असता त्याचा पाय शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील शहापूर … Read more

वीज जोडणीसाठी ‘तो’ पोलवर चढला, अचानक कुणीतरी सुरु केला विजेचा प्रवाह; पुढं घडलं असं काही…

CRIME NEWS 10

कराड प्रतिनिधी । वीज वितरण महामंडळाच्यावतीने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरींची वीज जोडणी, पोळ उभारणी करण्याची कामे हाती घेतली जातात. या ठिकाणी महामंडळाच्या वायरमन तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून हा कामे केली जातात. मात्र, वीज जोडणी करत असताना अनुचित घटनाही घडतात. अशीच घटना कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे शनिवारी घडली. या ठिकाणी एका विहिरीची वीज जोडणी करण्यासाठी पोलवर चढलेल्या … Read more

1 रुपयांत पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 91 हजार 500 शेतकऱ्यांची रेकॉर्डब्रेक नोंदणी

Bhagyashree Farande News

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपयांत पीक विमा योजनेत आज अखेर जिल्ह्यातील सुमारे 91 हजार 500 शेतकऱ्यांची सहभाग नोंदविला आहे. हि योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांकि आकडा झाला आहे. तथापि जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि 31 जुलै 2023 पूर्वी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठपुराव्यामुळे कराड बस स्थानकाचा ‘तो’ प्रश्न लागणार मार्गी

Prithviraj Chavan Karad ST Bus Stand

कराड प्रतिनिधी । सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय पावसाळी अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचनाक मांडली. त्यांच्या सूचनांची दखल मुख्यमंत्री एकनाथ … Read more

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वकिलाने केला थेट वनमंत्री मुनगुंटीवारांना फोन !

Adv. Mahadev Salunkhe Sudhir Mungantiwar News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वराडे गाव परिसरात मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन बिबटे असल्याची दृश्ये कैद झाली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता भाजपचे पदाधिकारी ॲड. महादेव साळुंखे यांनी आज थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. साहेब बिबट्याचा बंदोबस्त करा, … Read more

आ. बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात कृषी मंत्र्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; कृषिमंत्र्यांकडून आकडेवारी सादर

Balasaheb Patil Dhananjay Munde

कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास 17 जुलै 2023 पासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या बुधवारी पार पडलेल्या कामकाजावेळी माजी सहकार व पणन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रश्नावरून घेरले. आ. बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंनी आकडेवारी … Read more

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा आज दरवाजा उघडणार; धरणात ‘इतक्या’ TMC साठ्याची नोंद

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. दरम्यान पाटण तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणात 64.32 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी … Read more

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराडात पोलिसांचे संचलन

Karad City Police Movement News

कराड प्रतिनिधी । मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अंतर्गत मार्गावरून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यावेळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 पोलीस निरीक्षक, बारा पोलीस अधिकारी, 38 पोलीस अंमलदार वाहतूक, 1 आरसीपी पथक, 24 होमगार्ड यांचा संचलनात सहभाग घेतला होता. बुधवारी सायंकाळी सहा … Read more