कराडात बालस्नेही पोलीस ठाण्याचे झाले उद्घाटन; विशेष पोलीस महानिरीक्षकांनी लावली उपस्थिती

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा पोलीस दल व निर्माण बहुउद्देशिय विकास संस्थेमार्फत कराड येथील शहर पोलिस ठाण्यात बालस्नेही पोलीस ठाण्याचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याणू प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

कराडच्या कोयना नदीवरील जुन्या पुलाखाली आढळला 35 वर्षीय पुरूषाचा मृतदेह

CRIME NEWS 20240223 233529 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाखाली सुमारे ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह अढळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्यासारख्या खुणा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या जुन्या कोयना पुलाच्या परिसरातील नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह वाहनधारकांना दिसला. त्यामुळे … Read more

राष्ट्रवादी OBC सेलचे अध्यक्ष राजापूरकर यांनी घेतली खा. श्रीनिवास पाटील यांची भेट; 14 लोकसभा मतदार संघात बाईक रॅलीस सुरुवात

Karad News 38 1 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत १४ लोकसभा मतदार संघ, ९३ तालुके, ६७ विधानसभा मतदार संघ अशी २५०० किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान, आज ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर हे आपल्या रॅलीसह राष्ट्रवादी कोंग्रेसचे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कराडहून प्रवास करणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचे रेल्वे बोर्डाने दर केले कमी

Karad News 37 1 jpg

कराड प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) रेल्वे बोर्डाकड़ून रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून खास करून कराड येथून जाणाऱ्या रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर गुरुवारपासून पासून पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मिरज सांगली सातारापर्यंत धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्वीचे दर लागू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ दोन रेल्वे स्थानकांचा अमृत महोत्सव योजनेतून होणार कायापालट

श्रीनिवास पाटील 20240222 072033 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सातारा लोकसभा मतदार संघातील रेल्वे विषयीचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कराड आणि लोणंद या दोन्ही रेल्वे स्टेशनचा अमृत महोत्सव योजनेतून कायापालट होणार आहे. तर अन्य चार ठिकाणी अंडरपास ब्रिज होणार असून ह्या कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार दि.२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.     पुणे-मिरज … Read more

पैशासह किंमती ऐवजासाठी प्रवाशाचा खून करणाऱ्या ट्रक चालकास जन्मठेपेची शिक्षा

Crime News 19 jpg

कराड प्रतिनिधी । ट्रकने पुण्याहून कोल्हापूरला जाताना पैशांसाठी प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी ट्रक चालकास दोषी धरून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी सुनावली. संदीप शिवशंकराप्पा बुडगी (रा. बावीकेरे, ता. निलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, ता. जि. चित्रदुर्ग, कर्नाटक), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

कराडात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई; सात जणांना दंड

Karad News 34 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह लगतच्या महामार्गासह सर्वच मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. यावेळी सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कामाचा आढावा घेण्याची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली होती. या बैठकीत त्यांनी शहरालगतच्या महामार्गासह सर्व मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या … Read more

परजिल्ह्यातून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा अडकला कराड पोलिसांच्या जाळ्यात; 8 दुचाकी जप्त

Karad News 33 1 jpg

कराड प्रतिनिधी । विविध जिल्हयातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून एकूण 5 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. विक्रम रमेश सकट (वय 27, रा. बेघर वस्ती, सैदापूर, ता. कराड) असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेवून अटक केलेल्याचे नाव आहे. … Read more

कराडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिवादन

Karad News 27 jpg

कराड प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कराड शहरात शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “छत्रपतींच्या मनातले स्वराज्य स्थापन करण्यासाठी कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही … Read more

छत्रपतींचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल : खा. श्रीनिवास पाटील

Satara News 81 jpg

कराड प्रतिनिधी | छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल. त्यानंतर महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. … Read more

तळबीड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील 3 तस्करांना केली अटक, 1 कोटीचे मांडूळ जप्त

Crime News 12 jpg

कराड प्रतिनिधी | मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुपेश अनिल साने (रा. आड, ता. पोलादपूर), अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम (दोघेही रा. कापडखुर्द, ता. पोलादपूर, जि रायगड), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपये किंमतीचे मांडूळ पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील … Read more

कराडातील अंगणवाड्यांमध्ये मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Karad News 26 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने अंगणवाडीतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांना यशस्वीपणे ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. त्यानुसार कराड शहरात ही मोहीम राबविण्यात आली असून लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार अंगणवाडीसह विविध शाळांमध्ये या गोळ्यांचे वाटप … Read more