जखिणवाडीत 2 तासांच्या रेस्क्यू मोहिमेतून विहीरीत पडलेल्या 2 बिबट्याच्या बछड्यांची सुखरूप सुटका

Karad Lepard News 20230902 154902 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्याना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका मागून एक अशा 2 बिबट्याच्या बछड्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

कराडात मराठा क्रांती मोर्चाकडून जालनातील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध

Karad News 20230902 151918 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद शनिवारी कराड येथे उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कराडच्या दत्त चौकात निषेध नोंदविण्यात आला. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत गृहमंत्र्यांनी … Read more

कापील गावच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र; पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

Kapil village 20230824 193002 0000 2 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कापील गावच्या  लोकनियुक्त सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना अपात्र करण्यात आले आहे. सरपंचांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील मीटर सर्वांना एकाच दराने वाटप केली नसल्याची तक्रार तक्रारदार गणेश पवार यांनी केली होती. त्यानंतर सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती  विभागीय आयुक्त सौरभ … Read more

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी हा यशवंतराव मोहिते भाऊंचा आग्रह होता; पृथ्वीराजबाबांकडून आठवणींना उजाळा

Prithviraj Chavan 14 jpg

कराड प्रतिनिधी । मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 साली अस्तित्वात आला. पण त्याआधी 1953 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे विधेयक स्व. यशवंतराव भाऊंनी सर्वप्रथम मांडले व त्यावर ऐतिहासिक भाषण केले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी, हा आग्रह त्यांनी केला होता. काँग्रेसमध्ये असूनही स्व. भाऊसाहेब हिरे यांनीे शेकाप आमदार असलेल्या भाऊंच्या भाषणाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण आज यशवंतराव … Read more

रेठरे बु. पूल 25 टन क्षमतेपर्यंतच्या वाहतुकीस खुला; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

Prithviraj Chavan 1 jpg

कराड प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता हा पूल 25 टन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रु. 6 कोटी इतका निधी मंजूर झाला व यामधूनच पुलाची दुरुस्ती करण्यात आली. या … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकाला कराड न्यायालयाकडून 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Karad Court 20230822 153928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व 1.5 लाख रुपये दंडाची शिक्षा काल सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शिक्षा सुनावली आहे. रोहन दत्तात्रय शेटे (रा. चंदुररोड, इचलकरंजी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दीड दिवसात गंभीर आजारांच्या 42 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Karad Dr. Paras Kotharis News jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड व पाटण तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी … Read more

अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवणाऱ्या टोळीकडून कराडच्या दांपत्याचीही फसवणूक

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड परिसरातील एका दाम्पत्याला गंडा घालणाऱ्या या टोळीकडून कराड शहर परिसरातील आणखी एका दाम्पत्यालाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. विवाहित जोडप्यांची फसवणूक करणाऱ्या या टोळीला सहकार्य करणाऱ्या सातारा शहरातील बहिण – भाऊ असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलियास राशिद शेख, रेश्मा राशिद शेख (दोन्ही रा. करंजे पेठ, सातारा) … Read more

आधुनिक व्यायामशाळेच्या निधी संदर्भात ‘लिबर्टी’च्या शिष्टमंडळाने घेतली पृथ्वीराजबाबांची भेट

Liberty Mazdoor Mandal Prithviraj Chavan News jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील क्रीडा क्षेत्रांमध्ये मोठं नाव लौकिक असलेल्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या संचालक शिष्टमंडळाने आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांची भेट घेतली. यावेळी अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल घेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य क्रीडा आयुक्तांशी … Read more

पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद; गाड्यांचे मार्ग बदलले

Pune Satara Railway News jpg

कराड प्रतिनिधी । पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवत काही रेल्वेचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आली असून पुणे – कोल्हापूर धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे – सातारा मार्गे धावणार नसल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली … Read more

स्मशानभूमीत सापळा रचून ‘त्यांनी’ रेकॉर्डवरील आरोपीस केली अटक; 70 हजाराच्या देशी पिस्टलसह 2 जिवंत काडतूसं जप्त

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीतील स्मशानभुमी परिसरातून रेकॉर्डवरील आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून 70 हजार 400 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. अभिषेक संजय पाटोळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या स्थानिक गुन्हे … Read more