तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

सुनेला पळवून नेणाऱ्या तरूणाच्या वडिलांची हत्या, आई आणि भावावरही संशयिताचा खुनी हल्ला

20240314 165909 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरूणाच्या वडिलांची चाकूने वार करून हत्या करून आई आणि भावावर खुनी हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. १४) रात्री कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. बाबा मदने (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विजय धर्मा जाधव ( रा. सैदापूर, … Read more

कराड एसटी स्टँड परिसरात आढळला येवतीच्या तरूणाचा मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News 20240314 155223 0000 jpg

कराड प्रतिनिधी | येथील बसस्थानक परिसरातील बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर रस्त्याकडेला बुधवारी (दि. १३) रात्री साडे आठच्या सुमारास एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार जगदाळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल आजुबाजुला चौकशी केली, मात्र मृताची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख … Read more

अतुलबाबांनी पूर्ण केलं अनोखं चॅलेंज; झणझणीत चटणीपासून बनलेल्या डिशवर मारला ताव

Karad News 71 jpg

कराड प्रतिनिधी | भाजप नेते आणि सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एक अनोखं चॅलेंज पूर्ण केलं आहे. दुबई येथील एका हॉटेल मध्ये तिखट मिरची आणि झणझणीत चटणीपासून बनलेला एक पदार्थ खात अतुलबाबांनी मराठी बाणा दाखवून दिला आहे. याबद्दल अतुल भोसलेंना विजेतेपदाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असून याबाबतचा त्यांचा फोटो सुद्धा सर्वत्र व्हायरल होत आहे. हे … Read more

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास कराडातून शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा

Karad News 70 jpg

कराड प्रतिनिधी । दिल्लीत शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास पाठिंबा देत कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा पणन विभागाच्या प्रस्तावित कायद्याला शेतकऱ्याच्या वतीने विरोध करण्यात आला. कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनस्थळी कराड शेती उत्पन्न … Read more

‘मी कराडचा भाई आहे, खंडणी दे’ म्हणत भर चौकात एकास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 20240313 084724 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील बुधवार पेठेत एका तरुणाकडे खंडणीची मागणी करत त्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. किरण यमकर व महेश घाडगे(दोघेही रा. गुरुवार पेठ, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड येथील आंबेडकर चौकमधील … Read more

अलीकडे खूप वाचाळविरांची संख्या वाढलीय; प्रीतिसंगमावरून अजितदादांची टीका

Karad News 20240312 103736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | “अलिकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111 वी जयंती असल्याने यानिमित्त उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित

Karad News 20240311 233558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज मंगळवारी (दि .१२ मार्च) रोजी १११ वी जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी प्रीतिसंगमावर येणार आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा निश्चित झाल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाची उडाली तारांबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड दौरा सोमवारी रात्री उशिरा निश्चित झाला. … Read more

महामार्गावरील पादचारी पूल ‘या’ दिवशी पाडणार; महामार्गावरील वाहतुकीत होणार मोठा बदल…

Karad News 21 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड येथील खरेदी-विक्री पेट्रोल पंपासमोरील पादचारी पूल बुधवारी रात्री पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हा पादचारी पुल दोन टप्प्यात पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आज कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या … Read more

गॅरंटीची भाषा करणारे सगळे पक्ष हे ‘आपची’ कॉपी करतात : अजित फाटके-पाटील

Satara News 80 jpg

कराड प्रतिनिधी । सर्वात अगोदर अरविंद केजरीवाल यांनी गॅरंटी दिली आणि ती पूर्ण करून दाखवली. आज गॅरंटीची भाषा करणारे सगळे पक्ष हे आम आदमी पार्टीची कॉपी करत आहेत. खऱ्या अर्थाने जनतेच्या दारी जाणारे फक्त दिल्लीतील केजरीवाल सरकारच आहे. महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’चा फक्त इव्हेंट सुरू असल्याची टीका आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके-पाटील … Read more

कराड तालुक्यातील अवैध क्रशरवर ‘महसूल’ ची धडक कारवाई

crime news 20240308 231737 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड महसुल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी व प्रांताधिकारी म्हेत्रे यांच्या आदेशनुसार शुक्रवारी अचानक कारवाई केली. या कारवाईत आवश्यक परवाने नसलेले कराड तालुक्यातील सैदापूर मंडलातील ११, शेणोली मंडलातील ८, कवठे मंडलातील १, येळगाव मंडलातील १ आणि इंदोली मंडलातील १ असे एकुण २२ अनधिकृत क्रशर सुरु असल्याचे दिसुन आले. संबंधितांचे क्रेशर शुक्रवारी सील … Read more

ट्रॅक्टरची रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकीला धडक; एकजण ठार

Karad News 20240307 092234 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. कराड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कराड गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अरविंद मधुसूदन चिपाडे (वय, ६४. रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि.सांगली) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्रगड येथील अरविंद चिपाडे हे पत्नी स्नेहल यांच्यासह बुधवारी … Read more