कराड बाजार समितीतील संरक्षक भिंतीच्या वादावरून बाजार समिती सभापती-मुख्याधिकारी भिडले

Karad Market Commitee News jpg

कराड प्रतिनिधी । कराड बाजार समिती सभापती, संचालक मंडळ आणि कराड पालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली. विषय होता बाजार समितीतील संरक्षण भिंत पाडण्याचा. या विषयावरून दोन्ही संस्थेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आमनेसामने आले. भिंत पाडण्यास सुरुवात करणार इतक्यात सभापतींसह संचालक मंडळ, व्यापारी दाखल झाले. अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून भींत पाडण्याचा व रस्त्याबाबतचा आदेश दाखवा आणि मगच भींत … Read more

हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवास कराडात विजय दिवस चौकात मान्यवरांकडून अभिवादन

Karad News 20231013 121025 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार जवान शंकर बसाप्पा उकलीकर हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ११:३० वाजता येथील कराड येथील विजय दिवस चौकात दाखल झाले. या ठिकाणी त्यांना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड … Read more

इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

Karad Indoli College News 20231012 121157 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. … Read more

सातारा जिल्ह्यातील नायब सुभेदाराला लेहमध्ये वीरमरण; आज होणार अंत्यसंस्कार

Karad News 20231012 083915 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय- 38) हे जवान शहिद झाले आहेत. लेह येथे सोमवारी दि. 9 रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली असून शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब … Read more

रस्ता खुला झाल्यास आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार नाही; कराड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा थेट इशारा

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । काही दिवसापूर्वी कराड बाजार समितीच्या मुख्य आवारातून रहिवाशी रस्त्याची मागणी हि झाली होती. आणि पाच ते सहा दिवसापूर्वी याठिकाणी असणारी रस्त्यातील भिंत ३ फुटांनी पाडण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण व्यापार तिन्ही असोसिएशनने बंद ठेवले आहेत. या याठिकाणी रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडी होऊन अडचण निर्माण होणार … Read more

भारतरत्न विश्वेश्वरैय्या पुरस्कार निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी । दि कराड आर्किटेक्ट ॲड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने यावर्षीचा विश्वेश्वरय्या पुरस्कार २०२३ कराड तालुक्यातील केसे येथील निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वेणुताई चव्हाण स्मारक येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे … Read more

कराड शहरात उद्यापासून 4 दिवस पाणीपुरवठा बंद?; नेमकं कारण काय?

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरात दररोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. मात्र, कराड शहरात उद्या गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दि. १५/१०/२०२३ रोजीपर्यंत सलग चार दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कराड पालिकेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे. कराड पालिकेच्यावरतीने आज महत्वाचे निवेदन काढण्यात आलेले … Read more

सातारा जिल्ह्यातील 175 ग्रामसेवकांना तडकाफडकी नोटीसा; नेमकं कारण काय?

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तब्बल 175 ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामसेवकांनी फेरआकारणीची प्रक्रिया विहीत कालावधीत पूर्ण केली नसल्याने तरतुदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी दर चार वर्षांनी कराची फेरआकारणी करणे बंधनकारक … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आणि पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायती आणि 172 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी आज जाहीर केला. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक … Read more

शहराच्या मध्यवर्ती भागात चालायचा गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा गोरख धंदा; पोलीस, महसूल विभागाने छापा मारून केला पर्दाफाश

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान, या छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस व महसूल विभागास माहिती मिळाली. त्यानंतर येथील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी आज पहाटे पाच … Read more

कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत … Read more

4 राज्यांमध्ये तपास करून चोरीला गेलेले सव्वा दोन लाखांचे मोबाईल केले हस्तगत; ‘कराड गुन्हे प्रकटीकरण’ची धडाकेबाज कामगिरी

Karad Police News 20231010 090617 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं गहाळ झालेल्या तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या 15 मोबाईलचा यशस्वी शोध घेऊन ते मूळ मालकांना परत मिळवून दिलेत. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या गहाळ मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश या चार या राज्यातून शोध घेऊन ते परत देण्याच्या कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत … Read more