कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात लांब लचक ग्रेडेन अन् कमी उंचीची शिजू डॉग…

Karad News 20231127 190453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. दरम्यान यंदा प्रदर्शन अजून एक दिवस वाढवण्यात आलेले आहे. प्रदर्शनात चौथ्या दिवशी फळे, फुले आणि श्वान स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत दाखल झालेल्या श्वानांनी सर्वांचे लक्ष … Read more

2 टनाचा गजेंद्र रेडा अन् 3 फूट उंचीची पुंगूर गाय…

IMG 20231126 WA0018 jpg

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी जनावरांची स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला तो 2 टनाचा गजेंद्र रेडा आणि तीन ते साडे तीन फूट उंचीची बुटकी गाय. … Read more

अजितदादा-आनंदराव नानांची भेट, मग चर्चा तर होणारच!

Karad News 20231125 235928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कराड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आनंदराव नानांनी पुण्यात अजितदादांची भेट घेतली होती. नाना लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे आज दादा आणि नानांच्या … Read more

बचत गटांसोबत शेतकऱ्यांचा मालास मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Karad News 20231125 194249 0000 jpg

कराड प्रतिनिधी | नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. कराड येथील शेती उत्पन्न्न बाजार … Read more

विक्रीसाठी आलेले गावठी बनावटीचे 2 पिस्तूल जप्त, एकास अटक

Karad Crime News 20231125 075613 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दादा उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

Karad News 20231122 172818 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शेणोली, ता. कराड येथील ग्रामपंचायत सरपंचावर बुधवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय पवार यांनी मंगळवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली आहे. सरपंचाविरोधात तहसीलदार विजय पवार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे की, सरपंच जयवंत बजरंग कणसे हे मनमानी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून काम … Read more

ऊस दरासाठी रयत क्रांती संघटना शुक्रवारी करणार आंदोलन : सचिन नलवडे

Karad News 20231122 164023 0000 jpg

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ … Read more

कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’वर कार्यशाळा उत्साहात

Karad News 12 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभागाच्यावतीने ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी : अनफोल्डिंग मल्टिट्यूड ऑफ ड्रग टार्गेटस्’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे ८७ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या हस्ते … Read more

गावठी कट्टा अन् काडतुसासह 2 तरुणांना LCB कडून अटक

Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथे मसूर फाट्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी एक धाडसी कारवाई केली आहे. या ठिकाणी विक्रीकरण्याच्या उद्देश्याने घेऊन आलेला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन तरुणांना पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सुदर्शन किरण पाटील (वय 19, रा. आटके, ता. कराड) व मिथीलेश मारुती महिंदकर (वय 19, रा. … Read more

कराडात मनोज जरांगे-पाटील यांच्या सभास्थळी BDS अन् डॉग स्कॉड दाखल

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची आज रात्री कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भव्य अशी सभा होणार आहार. या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून संपूर्ण राज्याचं जरांगे पाटील यांच्या येथील होणाऱ्या सभेकडे लागले आहे. या ठिकाणी सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त … Read more

ऊस दरावरून शेतकरी अन् संघटना आक्रमक; कराड तालुक्यातील कारखानदाऱ्यांना दिला ‘हा’ थेट इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । यंदा देखील ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता त्यांच्यानंतर सर्वसामान्य शेतकरी देखील ऊस दरावरून आक्रमक होत असल्याचे बुधवारी दिसून आले. ऊस दरासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित येत आज कराड येथील दत्त चौकात जोरदार घोषणाबाजी केली. उसाला प्रति टन 5 हजार रुपये … Read more

साताऱ्यासह कराड, पाटणला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना आज पहाटे साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला असून ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही या … Read more