छोट्या छोट्या गोष्टींच्या आनंदातून जीवन बनते सुंदर : गणेश शिंदे

Karad News 10 jpg

कराड प्रतिनिधी । जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नाही; परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन नक्कीच सुंदर बनते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. कृष्णा सरिता महिला बझारच्यावतीने कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्व. श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांची ९१ … Read more

गुणांच्या कमाईवर माऊली कोकाटेने मारले कालेचे कुस्ती मैदान; 2 लाख इनामाचा ठरला मानकरी

Kale Yatra News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काले येथे श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळ व कराड तालुका कुस्ती संघटनेने नुकतेच निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रकाश बनकर विरूद्ध माऊली कोकाटे यांच्यातील प्रथम क्रमांकासाठी ५० मिनिटे काटा लढत झाली. अखेरीस पंचांनी गुणावर निकाल जाहीर केला. त्यानुसार माऊलीने प्रकाशवर गुणांची कमाई करत मैदान … Read more

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती

Satara Bharat Sankalp Yatra News jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे २४ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या यात्रेस आज कराड तालुक्यातील कोणेगाव … Read more

विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविणार : डॉ. अतुल भोसले

Anti Airport Expansion Action Committee Dr. Atul Bhosles visit 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वारुंजी, मुंढे, गोटे, केसे, पाडळी या भागातील ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणाला विरोध दर्शविला आहे. मात्र, विकासाचे काम करताना स्थानिक घटकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार नेहमीच घेत असते. त्यामुळे कराड येथील विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे आश्वासन भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले … Read more

केंद्र सरकारच्या इथेनॉल अन् कांद्याबाबतच्या निर्णय विरोधात ‘बळीराजा’ आक्रमक

Baliraja Farmers Association jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला बंदी घालण्याचा नुकताच एक निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही त्यामुळे तेही शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आज कराड येथील तहसील कार्यालय येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन … Read more

कराड पुरवठा विभागातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू : मनोज माळी

Karad News 9 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभाग येथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून धान्य कमी प्रमाणात वाटप केले आहे. याबाबतची तक्रार दि. 27 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे केली होती. मात्र, तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दि. १५ डिसेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न केल्यास धरणे आंदोलन करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली … Read more

…तर अगोदर बाधित शेतकऱ्यांच्या प्रेतावरुन जावे लागेल याद राखा : डॉ.भारत पाटणकर

Karad News 20231210 092501 0000 jpg

कराड प्रतिनिधी | बाधितांच्या पुनर्वसनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कराडला विमानतळ विस्तार वाढीचा घाट काही लोकांनी घातला आहे. खरं सांगायचं झालं तर या विरोधात २०१० पासून आमचा अविरत लढा सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा कायम राहणार आहे. त्यामुळे जर सरकारने हे विस्तारीकरण करण्याचा दबावाने प्रयत्न केलाच तर त्यांना अगोदर या बाधित शेतकऱ्यांच्या प्रेतावरून जावे … Read more

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ‘मनसे’चे इंग्रजी फलका विरोधात ‘खळखट्याक’ आंदोलन

Karad News 8 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील दुकानांवरील इंग्रजी फलक काढुन त्या ठिकाणी मराठा फलक लावावेत अन्यथा खळखट्याक आंदोलन करून असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील एका दुकानावरील इंग्रजी फलक मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली हटवून … Read more

कुणबी दाखल्यांच्या अडचणी सुटणार; मराठ्यांचे राज्यातील पहिले जनसंपर्क कार्यालय कराडात सुरु

Karad Kunbi Certificate PRO Office News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी नोंदींसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी कराडमधील कराड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. … Read more

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात करण्यासाठी समिती स्थापन

Shivaji University News jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटनांकडून मागणी केली जात होती. यासंदर्भात अनेकवेळा लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. याची दखल घेत व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही. … Read more

कालेत रविवारी होणार कुस्त्यांचे जंगी मैदान; नामवंत पैलवान थोपटणार दंड

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । काले ता. कराड येथे रविवार, दि. १० रोजी व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळाच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानात दीपक लोखंडे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी २ लाख रुपयांचा बक्षिसाची प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या प्रेरणेने … Read more

मुंबईला 55 प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला कराडच्या तासवडे टोनाक्यावर भीषण आग

Karad Crime News 20231207 101513 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या तसेच अचानक पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका परिसरात घडली. या ठिकाणी मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली तर आगीत १५ ते … Read more