उंडाळेत गॅस सिलिंडर स्फोटात उत्तर प्रदेशातील आईसक्रिम विक्रेत्याच्या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Karad News 15

कराड प्रतिनिधी । घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावात घडली आहे. मृत मुलगा हा आईसक्रिम विक्रेत्याचा असून हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंडाळे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना … Read more

निवडणूक निरीक्षकांकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या स्ट्राँग रूमसह मशीन्सची पाहणी

Karad News 14

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर पाठविण्यासाठी मतदान यंत्रे तयार करून सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमला तसेच मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू असलेल्या सिलिंग हॉलला आज निवडणूक निरीक्षण गीता ए. यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रथम त्यांनी मशीन्सच्या सिम्बॉल लोडिंगची तपासणी करून १००% यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. … Read more

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; 64 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Crime News 20241112 083836 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी छापा सत्र राबविले जात आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील वाठार गावचे हद्दीत बेकायदेशीर देशी/विदेशी दारुची वाहतूकीवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्व, विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर … Read more

कराड शहर पोलिसांची दमदार कारवाई, ओगलेवाडी घरफोडीच्या गुन्ह्यातील 58 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241111 211518 0000

कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी (ता. कराड) येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दागिने आणि रोख रक्कम मिळून 58 लाखांचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. ओगलेवाडी ता. कराड येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा … Read more

कराड आरटीओ कार्यालया मार्फत कराडात मतदान जनजागृती रॅली; रॅलीत तब्बल 25 वाहनांचा समावेश

Karad News 13

कराड प्रतिनिधी । कराड आरटीओ कार्यालय व कराड दक्षिण स्वीप पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मतदान जागृती करण्यासाठी मोटार वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आरटीओ कार्यालयाची तब्बल 25 वाहने सहभागी झाली होती. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वृंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून … Read more

कराड दक्षिण मतदारसंघातील नियुक्त सेक्टर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून महत्वाच्या सूचना

Karad News 12

कराड प्रतिनिधी । 260 कराड दक्षिण मधील विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र तयार करण्यासाठी नियुक्त सेक्टर ऑफिसर्स व सहाय्यक सेक्टर ऑफिसर्स यांचे प्रशिक्षण स्ट्रॉंगरूम शेजारील प्रशस्त हॉलमध्ये रविवारी घेण्यात आले. प्रशिक्षणार्थींना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पीपीटी द्वारे व प्रत्यक्ष मशीन हाताळणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब … Read more

कराड – मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकामध्ये तांत्रिक बिघाड; तब्बल दीड तास वाहतूक झाली ठप्प

Karad News 20241111 093711 0000

कराड प्रतिनिधी | कराड- मसूर रस्त्यावरील उत्तर कोपर्डेच्या हद्दीतील रेल्वे फाटकामध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुमारे एक दीड तास वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रेल्वे गेट पूर्ववत झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड – मसूर रस्त्यावर रेल्वे गेट क्र. ९६ मध्ये कोपर्डे हवेली बाजूच्या गेटमध्ये बिघाड झाल्याने … Read more

मद्यपी क्रेन चालकाची दुचाकीस भीषण धडक; कराडच्या 2 महिला ठार तर एक गंभीर जखमी

Crime News 20241111 080952 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी तालुका कराड गावच्या हद्दीत स्कूटी दूचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चालकाने दारुच्या नशेत भीषण धडक दिली. या भीषण धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या तर अठरा वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. सदरचा अपघात रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. रुक्मिणी परदेसी (36) व … Read more

कराड दक्षिणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान मशीनच्या सुरक्षिततेबाबत माहिती

Karad News 11

कराड प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज कराड दक्षिण मतदार संघात रिंगणात असलेल्या सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृतरित्या नियुक्त प्रतिनिधीनी स्ट्रॉंगरूमला भेट दिली. आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निरीक्षक गीता ए, व निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम सील व त्यांच्या कडेकोट बंदोबस्तातील सुरक्षिततेबाबत आवश्यक ती सर्व माहिती … Read more

महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का?; कराडात सुषमा अंधारे यांचा सवाल

Karad News 34

कराड प्रतिनिधी । एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या – आमच्या विकासाचे बोलत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. याचा नीट विचार करा. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत की, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली. सरकारी योजनेवर हे … Read more

सावत्र भाऊ अन् बहिणींना त्यांची जागा दाखवा; ओंडच्या महायुतीच्या महिला मेळावात चित्राताई वाघ यांची टीका

Karad News 33

कराड प्रतिनिधी । महायुती सरकारमधील लाडक्या भावांनी आपल्या ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि … Read more

भव्य रांगोळ्या व पथनाट्यातून मतदान जागृती; कराड दक्षिणमध्ये स्वीप पथकाचा उपक्रम

Karad News 32

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवूया..! सर्वांनीच मतदानाचा निर्धार करूया..!! असे म्हणत कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड शहर व परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. कराड शहरातील विविध चौकामध्ये तसेच प्रीतीसंगम घाटावर मतदान जागृतीच्या भव्य रांगोळ्या काढून लोकांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. तसेच यशवंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशवंत हायस्कूल सह आझाद … Read more