‘मिरज-पंढरपूर एक्सप्रेस’चे कराडला उत्साहात स्वागत; आठवड्यातील ‘या’ 3 दिवशी धावणार…

Karad News 72 jpg

कराड प्रतिनिधी । नुकतीच मंजूर झालेलया सातारा-दादर व्हाया मिरज-पंढरपूर एक्सप्रेस (Miraj-Pandharpur Express) रेल्वेचे शनिवारी कराड येथील रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरू होण्यासाठी पुणे येथे झालेल्या सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, शनिवारी हि गाडी सातारा येथे दाखल झाल्यानंतर क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य अँड. … Read more

मंजुरी कराडला अन् स्थलांतर साताऱ्याला; ‘कॅथलॅब’बाबतचा नेमका शासन आदेश काय?

Karad News 20240317 092807 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ग्रामीण भागात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेत आरोग्य विभागाने कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात माफक दरात हृदरुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात येणार होती. मात्र, कॅथलॅब कराडला मंजुर होऊन सुरु होण्याअगोदरच ती साताऱ्याच्या जिल्हा शल्य चिकीत्सालयात हलवण्यात आली आहे. कराडला मंजुरी … Read more

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 2024 03 16T181202.463 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली … Read more

कराडातील शिवशंकर पतसंस्थेतील 13 कोटींच्या अपहार प्रकरणी अहवाल

Crime News 28 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेत 13 कोटी 9 लाख 96 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार घडला आहे. ठेवी नसताना देखील ठेवतारण कर्जांचे वाटप, विनातारण कर्जे, कागदपत्रांची पूर्तता नसताना कर्ज वितरण, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे यांच्या आधारे अपहार करण्यात आल्याचा अहवाल विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी नुकताच दिला आहे. याची चौकशी सुरू असल्याच्या … Read more

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजच्या ग्रामस्थांचा रास्तारोको; कराड-सातारा लेनवरील वाहतूक ठप्प

Water News 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याच्या कारणाने या विरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शुक्रवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील कराड ते सातारा लेनवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीकडे प्रशासनाकडून व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष … Read more

तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

सुनेला पळवून नेणाऱ्या तरूणाच्या वडिलांची हत्या, आई आणि भावावरही संशयिताचा खुनी हल्ला

20240314 165909 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरूणाच्या वडिलांची चाकूने वार करून हत्या करून आई आणि भावावर खुनी हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. १४) रात्री कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. बाबा मदने (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विजय धर्मा जाधव ( रा. सैदापूर, … Read more

कराड एसटी स्टँड परिसरात आढळला येवतीच्या तरूणाचा मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News 20240314 155223 0000 jpg

कराड प्रतिनिधी | येथील बसस्थानक परिसरातील बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर रस्त्याकडेला बुधवारी (दि. १३) रात्री साडे आठच्या सुमारास एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार जगदाळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल आजुबाजुला चौकशी केली, मात्र मृताची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख … Read more

अतुलबाबांनी पूर्ण केलं अनोखं चॅलेंज; झणझणीत चटणीपासून बनलेल्या डिशवर मारला ताव

Karad News 71 jpg

कराड प्रतिनिधी | भाजप नेते आणि सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एक अनोखं चॅलेंज पूर्ण केलं आहे. दुबई येथील एका हॉटेल मध्ये तिखट मिरची आणि झणझणीत चटणीपासून बनलेला एक पदार्थ खात अतुलबाबांनी मराठी बाणा दाखवून दिला आहे. याबद्दल अतुल भोसलेंना विजेतेपदाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असून याबाबतचा त्यांचा फोटो सुद्धा सर्वत्र व्हायरल होत आहे. हे … Read more

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास कराडातून शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा

Karad News 70 jpg

कराड प्रतिनिधी । दिल्लीत शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास पाठिंबा देत कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा पणन विभागाच्या प्रस्तावित कायद्याला शेतकऱ्याच्या वतीने विरोध करण्यात आला. कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनस्थळी कराड शेती उत्पन्न … Read more

‘मी कराडचा भाई आहे, खंडणी दे’ म्हणत भर चौकात एकास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 20240313 084724 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील बुधवार पेठेत एका तरुणाकडे खंडणीची मागणी करत त्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. किरण यमकर व महेश घाडगे(दोघेही रा. गुरुवार पेठ, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड येथील आंबेडकर चौकमधील … Read more

अलीकडे खूप वाचाळविरांची संख्या वाढलीय; प्रीतिसंगमावरून अजितदादांची टीका

Karad News 20240312 103736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | “अलिकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111 वी जयंती असल्याने यानिमित्त उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more