वंचित बहुजन आघाडीच्या कराडच्या माजी शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Karad News 20240403 162158 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी (भारिप बहुजन महासंघ) चे माजी कराड शहर अध्यक्ष अमोल काटरे (बाळासाहेब) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी आज कराड भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते अमोल काटरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा कराड शहर उपाध्यक्ष श्री. … Read more

युवा मतदार विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढून अन् गीत गाऊन केली मतदान जागृती

20240402 191709 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयातील युवा मतदार विद्यार्थी व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून रेठरे बुद्रुक येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीच्या माध्यमातून युवा मतदारांनी “आम्ही मतदान करणार तुम्हीही करा,” अशा आशयाची जनजागृती केली या रॅलीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची … Read more

कराड – चांदोली मार्गावरील दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर

Accident News 3 jpg

कराड प्रतिनिधी । माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेट वडील जागीच ठार तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कराड – चांदोली मार्गावरील कराड तालुक्यातील कालेटेक गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळच्या सुमारास ही भीषण अपघाताची दुर्घटना घडली. अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, … Read more

रंगोत्सवावेळी ‘त्यांनी’ बंदुकीतून केला हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा

Karad News 20240401 142857 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश तानाजी थोरात, अधिकराव निवृत्ती पवार, वसंत दाजी पाटील (सर्वजण रा. जखीणवाडी) अशी गुन्हा दाखल … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक कारचा भीषण अपघात; चार प्रवाशी जखमी

Car Accident News 20240401 130308 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा हद्दीत सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. यामध्ये कारच्या पुढील बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला तर आतील चार प्रवाशी जखमी झाले. संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर … Read more

तळबीड येथे विहिरीत पडला बिबट्या, अचानक बाहेर येत ठोकली धूम…

Leopard News 20240329 141400 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तळबीड ता. कराड येथील जानाई मंदीराकडे जाणाऱ्या रोडवरील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी 29 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याने याबाबतची माहिती सरपंच उमेश मोहिते यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडणार इतक्यात बिबट्याने बाहेर येत धूम ठोकली. याबाबत अधिक … Read more

कराडात रविवार होणार इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा, आ. बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Karad News 83 jpg

कराड प्रतिनिधी | इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा रविवारी सायंकाळी ४ वाजता पंकज हॉटेलच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस … Read more

मसूरच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

Masur News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । मसूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात चारही दिशेला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सध्या अनेक दिवसांपासून बंद असून नादुरुस्त आहेत. चौकात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे शोपीस बनून राहिले आहेत. मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या घटनांना आळा बसून घटना कॅमेरात कैद … Read more

जरंडेश्वर – सातारा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा होणार विस्कळित; आजपासून ‘या’ गाड्या रद्द

Satara News 20240326 110915 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर – सातारा या दरम्यान आजपासून दि. २६ शुक्रवार अखेर दि. २९ ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत. मंगळवारी दि.२६ रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ … Read more

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पृथ्वीराजबाबांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240324 210316 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या … Read more

मलकापूरातील लाहोटीनगरमधील भरवस्तीतून बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Karad News 82 jpg

कराड प्रतिनिधी । पाणी आणि भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कराड तालुक्‍यातील मलकापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर नांदलापूर, जखिणवाडी, चचेगावसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह ५२ गावांत बिबट्याचा वावर आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मलकापुरातील लाहोटीनगर परिसरातील भर वस्तीतून शाळुच्या शेत शिवारातून बिबट्या संचार करत असल्याचे नागरिकांना दिसून झाले. या अघटनेमुळे … Read more

कराड डीबी पथकाची मोठी कारवाई, दारूची वाहतूक करणाऱ्या बोलेरोसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Karad News 81 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आचारसंहिता सुरू असताना वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली. माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेने बैल बाजार- मलकापूर रस्त्यावर गोकाक पेट्रोल पंपाजवळ … Read more