गोटे हद्दीत महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव एसटीची धडक: अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

Crime News 5

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत दुभाजकाच्या झाडीतून घाईगडबडीत महामार्ग ओलांडताना भरधाव एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. सोमवारी दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. बंटीराज बल्लाळ (रा. तांबवे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघातस्थळ व पोलिसांकडून … Read more

वनवासवाडी, कोळेकरवाडी शिवारात रानगव्यांच्या कळपांचा वावर; पिकांचे नुकसान

Wild Cattle News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा … Read more

विहिरीचा भाग कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू, तीन कामगार बचावले

Karad News 20240515 104614 0000

कराड प्रतिनिधी | उत्तरमांड नदीच्या काठावर विहिरीची सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू असताना एका बाजूची पडदी अचानक कोसळून ढिगाऱ्याखाली गाढले गेलेल्या चार कामगारातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित तीन कामगार बचावले असल्याची घटना मंगळवारी घडली. कराड तालुक्यातील भवानवाडी येथे घडलेल्या घटनेमुळ हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील भवानवाडीत … Read more

पाचव्या दिवशीही वळीवाची हजेरी : दुष्काळी माण तालुक्यात पाणीच पाणी तर कराडात विजांचा कडकडात

Satara Karad News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वळवाचा पाऊस कोसळत असून आज सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. दुष्काळी माण तालुक्यातही मंगळवारी दुपारीनंतर चांगला पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सातारा येथील पोवई नाक्यावर महाकाय झाड अवकाळी पावसामुळे … Read more

किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत परप्रांतीय युवकाचा खून; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Crime News 1

कराड प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून २ परप्रांतीय कामागारात झालेल्या शाब्दीक वादावरून एकचा खून झाल्याची घटना काल सोमवारी रात्री कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अन्य एका परप्रांतियास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस व घटना स्थळावरून मिळालेलया माहितीनुसार, छत्तीसगड येथून मजुरी कामासाठी काही कामगार भोसलेवाडी येथे आले. त्या कामगारामध्ये काल सोमवारी रात्री मारामारी झाली. … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

रखरखत्या उन्हात ‘त्यांनी’ काढला हक्काच्या घरकुलासाठी कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित कुटुंबाना घरकुल मिळनेबाबत तसेच घरकुलाच्या अनुदान मागणीसाठी आज घरकुल संघर्ष समितीच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रखरखत्या उन्हात कराड तालुक्यातील नागरिक, महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी … Read more

बेकायदा कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा,8 जनावरांची सुटका; 2 संशयित ताब्यात

Karad News 3

कराड प्रतिनिधी । कराड येथील मुजावर कॉलनीत पोलिसांनी बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत आठ जनावरांची सुटका केली असून कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलोचे अवशेषही जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलिस झालेली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान सिकंदर शेख (वय ३४, रा. चांद पटेल वस्ती, कराड) व समीर जावेद नदाफ … Read more

जिल्ह्यात साताऱ्यासह कराड परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाची हजेरी

Satara News 20240511 180243 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच सातारा शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारच्या वेळी ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी वारेही वाहत होते. दरम्यान, कराड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे पारा घसरला असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सातारा शहरासह … Read more

कराडातील कुप्रसिध्द गुन्हेगार कुंदन कराडकरवर MPDA कायदयान्वये स्थानबध्द कारवाई

Karad Crime News 20240511 133837 0000

कराड प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार (धोकादायक व्यक्ती) यांच्यावर कटोर प्रतिब्धक कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कराड शहर स्टेशन हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार कुंदन जालींदर कराडकर (वय २७, रा. गजानन हौसिंग सोसायटी,सैदापुर ता. कराड जि. … Read more

नवरदेवाच्या गावदेवावेळी दोन गटात झाली तुंबळ हाणामारी; 19 जणांवर गुन्हा

20240510 160655 0000

कराड प्रतिनिधी | लग्नाच्या गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गट चांगलेच एकमेकांच्या भिडले. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना कराड तालुक्यातील घारेवाडी गावात घडली. याबाबत कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिनाथ काशीनाथ घारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदराव धोंडीबा घारे, संजय धोंडीबा … Read more

निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला कराडनजीक भीषण अपघात, 12 किरकोळ तर 3 पोलीस गंभीर जखमी

Karad News 20240508 163213 0000

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना पोलिसांच्या खासगी ट्रॅव्हल्सला गुहागर-विजापूर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. या अपघातात बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य १२ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कराडमधील सहयाद्रि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व … Read more