जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; मुलाच्या स्वागतासाठी फुले, हार-तुरे अन् फुगेही!

Karad News 22

कराड प्रतिनिधी । सुट्टीच्या माहोलातून ‘स्कूल चले हम’ म्हणत आज शनिवारी जिल्हा परिषदसह नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाले. पण तरीही पालकांना सोडून वर्गात बसण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे रडवेले झाले होते. विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न काही ठिकाणी अपुरे पडले. शाळेसह वर्गांना सजावट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन अनेक शाळांनी स्वागत समारंभ उत्साहात … Read more

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; कराडला शंभरभर अधिकाऱ्यांची 24 तास नेमणूक

Karad News 21

कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना या घडत असतात. अशा काळात आपत्ती व्यवस्थापन विभाग व NDRF पथकाकडून कार्यवाही केली जाते. सध्या कराड-पाटण तालुक्यात पाऊस झाला असला तरी अतिवृष्टीच्या काळात दरडी कोसळण्याच्या घटना गद्य असल्याचे लक्षात घेत त्याबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कराड- पाटणचे प्रशासन सज्ज झाले आहे. कराडला आपत्ती व्यवस्थापन कक्ष … Read more

कोयना नदीत मच्छीमाराला सापडला 25 किलोचा ‘कटला’, खरेदीसाठी उडाली झुंबड

Karad News 19

कराड प्रतिनिधी । कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पुर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. अनेक महिन्यांनी मच्छिमारांना नदीत मासे सापडत आहेत. शनिवारी सकाळी तांबवे येथील एका मच्छिमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल २५ किलोचा कटला मासा सापडला. हा मासा … Read more

बकरी ईदसाठी कराडच्या जनावरांच्या बाजारात 15 हजारांपासून 1 लाख रूपयांपर्यंत बोकडांची विक्री

Karad News 20240614 090634 0000

कराड प्रतिनिधी | सोमवार दि. 17 रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने गुरूवारी कराडच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. 15 हजार रूपयांपासून 1 लाख रूपये किमतीचे बोकड विक्रीसाठी आले होते. एकाच दिवसांत जवळपास 772 बोकडांचे खरेदी-विक्री व्यवहार झाले असून सुमारे पाच कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजात … Read more

कराडातील ‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटनांकडे पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड-मलकापूर मार्गावरील मार्केटयार्ड परिसरात स्वा. सै. शामराव पाटील भाजीपाला व फळे मार्केट मार्गावर गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुमारे दोन तास एक किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या परिसरातीलच कराड – तासगाव मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर तीन जवळ मंगळवारी काले येथील एका शिक्षकाचा मालट्रकखाली सापडून अपघाती … Read more

कराडातील कृष्णा नाक्यावर दिवसा ढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थी- युवकांच्यात तुंबळ हाणामारी

Karad News 14 1

कराड प्रतिनिधी । दोन युवकांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना कराड येथील कृष्णा नाक्यावर असलेल्या पुलानजीक गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर बाचाबाची होऊन एकमेकांवर दगडफेक देखील झाली. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे काहीकाळ … Read more

हजारमाची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला जिरगे यांची बिनविरोध निवड

Karad News 13

कराड प्रतिनिदि । कराड तालुक्यातील हजारमाची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला जिरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सत्ताधारी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. विद्या घबाडे यांनी राजीनामा दिल्याने हजारमाचीचे सरपंच पद रिक्त झाले होते. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सैदापूरचे मंडल अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत … Read more

हजारमाचीतील सोमनाथ सुर्यवंशी टोळीला मोक्का, आणखी टोळ्या पोलिसांच्या रडारवर

Karad News 12

कराड प्रतिनिधी | कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीला मोठा दणका दिला आहे. कराड तालुक्यातील हजारमाची येथील सोमा उर्फ सोमनाथ उर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी, रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे आणि आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यावरील मोक्कांतर्गत दोषारोपपत्राला अप्पर पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. सोमनाथ सुर्यवंशी याच्यावर यापुर्वी कराड शहर तसेच … Read more

कराडकरांनो पाणी पिताना सावधान; दूषित पाणी पुरवठ्याबाबत पालिकेनं केलं महत्वाचं आवाहन

Karad News 11

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाली असून पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली असली तरी नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून शहरातील नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात … Read more

कराडच्या मार्केटयार्ड रस्त्यावर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड-तासगाव मार्गावर कार्वे नाका हद्दीत एका मालट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत प्रकाश माळी ( वय 55, रा. काले, ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात ठार झालेले शशिकांत माळी हे आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथे शिक्षक होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

हरवलेले 4 लाखांचे मोबाईल कराड तालुका पोलिसांनी मूळ मालकांना केले परत

Karad News 20240611 091818 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल फोन चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गहाळ झालेले सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल शोधण्यात तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांनी शोधून काढलेले मोबाईल पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. … Read more

कराडात भर रस्त्यात महामंडळाची ‘एसटी’ पडली बंद; तासभर वाहतूक कोंडीने नागरिक झाले हैराण

Karad News 4

कराड प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचा वापर किती वर्षे करायचा? याची मर्यादा निश्चित आहे. नवीन बस १५ वर्षे वापरता येते तर १५ वर्षांनंतर ती बस वापरातून बाजूला काढली जाते. कराड बसस्थानकात असलेल्या काही बसेस १२ वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्या आरटीओकडून रिपासिंग करून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बस प्रवासातच बंद … Read more