कराडात रिक्षांना आता ‘क्यूआर कोड’; महिला, युवतींना मिळणार रिक्षाची माहिती

Karad News 41

कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस … Read more

शामगावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला; ग्रामस्थांनी केली फटाक्यांची आतिषबाजीसह गुलालाची उधळण

Karad News 40

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव या गावातील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. एकदा तर पायी चालत कराड तहसिलदार कार्यावर मोर्चा काढला.त्यांच्याकडून शेतीच्या पाण्याची करण्यात आलेली मागणीची दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी पाणी प्रश्नास मान्यता दिली. त्यामुळे शामगावच्या शेतीस पाणी मिळण्याचा मार्ग सुकर … Read more

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई करणार; बाजार समितीचा इशारा

Karad News 39

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून देण्यात आलेली आहे. ठरवून देण्यात आलेल्या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत सचिवांनी बाजार समिती कार्यक्षेत्रातील खरेदीदार व्यापाऱ्यांना सूचनापत्र दिले असून दक्षता घेण्यास … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावात 2 कुटुंबांत जोरदार मारामारी; परस्परविरोधी तक्रारीनंतर सहा जणांवर गुन्हा

Karad News 20240926 114701 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटना घडण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. दरम्यान, अशीच एक घटना कराड तालुक्यातील वाघेरी गावात बुधवारी सकाळी घडली. शेतात पाणी साचल्याने टाकलेल्या पाइपलगतचा दगड काढण्याच्या कारणावरून वाघेरी गावातील दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारामारी झाली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

Karad News 20240925 161856 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल … Read more

विद्यानगरमध्ये मद्यधुंद युवकांची कॉलेजसमोर हुल्लडबाजी; पोलिसांनी पाठलाग करून दारूच्या बाटल्यासह पकडले

Karad Crime News 20240925 124617 0000

कराड प्रतिनिधी । सध्या कराडच्या महाविद्यालय परिसरात युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. दरम्यान, काही मद्यधुंद युवकांनी विद्यानगर येथील एका विद्यालयाच्या आवारात कार घालून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. पोलिस पोहोचल्यानंतर त्यांनी तेथून कारसह पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून या युवकांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर परिसरात मंगळवारी दुपारी … Read more

कराडच्या कार्वे गावातील मराठा बांधवांनी जरांगे पाटलांसाठी केले एकदिवसीय उपोषण; शाळकरी मुलांनीही दिला पाठिंबा

Karave News 20240924 155843 0000

कराड प्रतिनिधी | अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काल कराड तालुका मराठा बांधवांनी दत्त चौकात आंदोलन केले. त्यानंतर आज तालुक्यातील कार्वे गावातील ग्रामस्थांसह मराठा बांधवांनी एक दिवसाचे उपोषण करीत पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यासाठी शाळकरी मुलांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावली तर ग्रामस्थांनी देखील … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Karad News 20240924 141654 0000

कराड प्रतिनिधी | येत्या १५ दिवसात बाधीत जमिनींचा मोबदला न मिळाल्यास सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू प्रकल्प बाधीत संतप्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन देखील काल प्रशासनास दिले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाधीत जमिनींचा सर्वे होऊन १३ वर्षे उलटून गेली मात्र अद्याप या जमिनींचा … Read more

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली अकरा लाखांची फसवणूक

Karad Crime News 20240924 111956 0000

कराड प्रतिनिधी | दोन ट्रॅक्टर मालकांची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली मुकादमाने अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुकादामावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवे मालखेड, ता. कराड येथील ट्रॅक्टर मालक शशिकांत सुभाष मारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अनिल बंडू धोत्रे (रा. ताकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) या मुकादमावर गुन्हा दाखल झाला … Read more

उधारीच्या पैशावरून ‘त्यानं’ काढला ‘त्याचा’ कायमचा काटा!

Crime News 20240924 080353 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर गावात राहणाऱ्या शिवाजी लक्ष्मण सावंत यांचा 5 सप्टेंबरला संशयास्पदरित्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता पोलिस चौकशीत पशुखाद्याच्या उधारीवरून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एका संशयिताला गजाआड केले असून दिलीप लक्ष्मण कराळे असे त्याचे नाव असून सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी … Read more

कराडच्या बुधवार पेठेतील भाजी मंडई हलवा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू; नागरिकांसह डॉक्टरांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

Karad News 20240923 190634 0000

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटल पर्यंतच्या भाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा दिला. कराड येथील बुधवार पेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांना तसेच येथील … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागला तर…; कराडात मराठा समाज बांधवांचा आंदोलन करत सत्ताधारी विरोधकांना इशारा

Karad News 20240923 180330 0000

कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण केले असून उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. दरम्यान, वडीगोद्रीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज कराड येथील दत्त चौकात कराड तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी 50 टक्याच्या आतील मराठा … Read more