कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावल्याप्रकरणी चौघांना शिक्षा व दंड

Karad News 12 1

कराड प्रतिनिधी । कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला केबिनमध्ये कोंडून केबिनला बाहेरुन कुलूप लावल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी चौघांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व 5 हजार 200 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अण्णासाहेब नि. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सतीश विष्णू पाटील, सुहास शामराव पाटील, महेशकुमार शिवाजी शिंदे, … Read more

कराडमधील सराईत गुन्हेगार MPDA खाली स्थानबद्ध, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Karad News 10 1

कराड शहर । शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडाला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारीत झाला होता. तेव्हापासून पसार असलेल्या कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेऊन त्याची रवानगी सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. कराड शहरात विविध प्रकारचे 10 गुन्हे करुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक़ कारवाई करुनही … Read more

कराड दक्षिणच्या डोंगरी विभागातील बंदिस्त पाईपलाईन योजनेला 2 महिन्यात मंजुरी : डॉ. भारत पाटणकर

Karad News 8 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती येथे कराड दक्षिण डोंगरी विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठकी घेण्यात आली. या बैठकीत “कराड दक्षिणच्या डोंगरी विभागाला बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेचे काम पूर्ण होऊन योजनेला प्रशासकीय … Read more

आहो मास्तर, पोरगं नापास झालं..आता काय करायचं! उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री, पाहा व्हिडिओ

Karad News 7 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या डायलॉग आणि स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. उदयनराजे स्टेजवर आले की टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. कधी ते बाईक राईड मारतात, तर कधी जीप्सी राईड. त्यांच्या कॉलर उडवण्याची स्टाईल तर फारच प्रसिद्ध आहे. दिलखुलास अंदाज आणि डायलॉगवर तरूणाई फिदा असते. ‘एक बार … Read more

मसूर ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा बदलला लूक; अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे झाले चित्रीकरण

Masur News 1

कराड प्रतिनिधी । इंग्रज राजवटीतील ब्रिटिशकालीन असणारे रेल्वे स्थानक कराड तालुक्यातील मसूरमध्ये आहे. या रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरण करण्यात आले आहे. कराड तालुक्यातील मसूरच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा लूक बदलण्यात आला असून जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. अजूनही दगडी व भक्कम रेल्वे स्थानकाचे बांधकाम असल्येल्या या इमारतीच्या बाजूलाच सर्व सोयींनीयुक्त प्रशस्त व … Read more

कराडात तोतया पोलिसांनी महिलेचे साडेपाच लाखाचे दागिने केले लंपास

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । “मी कराड शहर पोलीस ठाण्याचा अधिकारी आहे. काल येथे सविता नावचे महिलेचा सोन्याच्या दागिन्यासाठी खून झाला आहे. आणि तुम्ही इतके सोन्याचे दागिने घालून कशाला फिरता, सोन्याचे दागिने काढून ठेवा,” असे सांगत महिलेचे साडेपाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दोघांनी पोबारा केल्याची घटना कराड शहर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या शाहू चौकात … Read more

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उदयनराजेंचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले की, ‘मी यशवंतरावांचा मानसपुत्र…

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी … Read more

महामार्गाच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज चव्हाण भडकले; थेट अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते. दक्ष कराडकर या सामाजिक संस्थेचे प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन हायवेवरील कामामुळे निर्माण झालेली ट्राफिक समस्येबाबत माहिती दिली. त्यांच्या निवेदनाची तात्काळ … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 2 दिवसात वाढले ‘इतके’ टीएमसी पाणी

Patan News 1 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.24 टीएमसी इतका झाला असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 15 आणि महाबळेश्वरला 15 मिलीमीटरची नोंद झाली आहे.  … Read more

पुसेसावळी दंगल प्रकरणी विक्रम पावसकरच्या सहभागाचा अहवाल 6 आठवड्यात सादर करा; High Court चे पोलिसांना आदेश

Satara News 7 1

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना आदेश दिला आहे. पुसेसावळी दंगलीत भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल 6 आठवड्यात सादर करावा, असे न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या बेचने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पावसकर यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते. … Read more

विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे – खासदार उदयनराजे भोसले

Masur News

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौरा सुरू केला आहे. सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे अश्वमेध मंगल कार्यालयात आभार मेळावा झाला. यावेळी … Read more

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

Karad News 16

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नुकताच छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी … Read more