मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहा:कार; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा 75.26 टीएमसी झाला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण 71.51 टक्के भरले असून धरणात 75 हजार 215 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार … Read more

वाल्मीक पठारावर जाणाऱ्या जाधववाडी-मत्रेवाडीमधील घाटात रस्ता खचला

Valmik Plateau News

पाटण प्रतिनिधी | कराड,पाटण तालुक्यासह ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे ढेबेवाडी विभागातील डोंगरावरील अनेक गावचा रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर जाणाऱ्या पवारवाडी (कुठरे) निगडे मार्गावरील घाटातील रस्ता मुसळधार पावसामुळे जाधववाडी दरम्यानच्या धोकादायक वळणावरच खचला आहे. वळणावरच रस्ता खचला असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अगोदर … Read more

कराडात अज्ञातांकडून DP जैन कंपनीच्या ठेकेदाराच्या क्रेनसह 2 पोकलँडच्या काचांची तोडफोड

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर ठेकेदार असलेल्या डीपी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या घडलेल्या घटनेनंतर आज बुधवारी सकाळी कराड मधील अज्ञात तरुणांनी ठेकेदाराची क्रेन व २ पोकलँडच्या काचांची तोडफोड कारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक … Read more

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत घरी आलेल्या एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karad News 20240723 222622 0000

कराड प्रतिनिधी | हद्दपारीचा आदेश असताना देखील पिस्तूल घेवून घरी आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहरातील रेठरेकर कॉलनीमध्ये पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी ही धडक कारवाई केली. निशिकांत निवास शिंदे (रा. रेठरेकर कॉलनी, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड शहरातील रेठरेकर कॉलनीतील निशिकांत शिंदे … Read more

कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता : आ. पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3

कराड प्रतिनिधी । कराड शहरात जो पाणीपुरवठा विस्कळीत झाला तो महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे घडलेल्या अपघातामुळे मुख्य पाईप वाहून गेली हे स्पष्ट कारण असले तरी असे अपघात पुन्हा घडू नये आणि जरी घडला तरी शहराला होत असलेला पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे असल्याचे … Read more

महामार्ग प्राधिकरण अन् टोल प्रशासनाच्या बैठकीत ‘इतके’ महिने टोलमाफीचा निर्णय

Karad News 2

कराड प्रतिनिधी | महामार्ग प्राधिकरण व तासवडे टोलप्रशासनाबरोबर सर्वपक्षीय स्थानिकांची टोलमाफी संदर्भात वादळी बैठक झाली. या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाकडून तासवडे टोलनाकाच्या दहा किलोमीटर परिघातील सर्व स्थानिकांना दोन महिने टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, कायमस्वरूपी टोलमाफी मिळावी यावर स्थानिक ठाम आहेत. दरम्यान, दोन महिन्यांनी पुन्हा आमच्यावर टोलची सक्ती केली तर पहिल्यांदा तासवडे टोलनाका जिल्ह्याच्या … Read more

साताऱ्यासह कराड मार्गावरील CCTV कॅमेऱ्या संदर्भात खा. उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 1

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच कराड शहरास भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी कराड शहरातील पाणी प्रश्नाबरोबरच इतर समस्या देखील जाणून घेतल्या. यानंतर खा. उदयनराजेंनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना एक निवेदन दिले असून सातारा आणि कराड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही शहरातील सर्व मार्गांवर वाहनांची नंबरप्लेट वरील फोटो घेता येईल अशी क्षमता … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी कराड पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे मानले आभार

Karad News 1

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील पाणी पुरवठा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यापासून ते कराड शहराला पाणी पुरवठा पूर्ववत करेपर्यंत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे अहोरात्र काम केले. त्यांच्या या कामाबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन आभार मानले. कराड शहरातील पाणी पुरवठा खंडित झाल्यानंतर आ. पृथ्वीराज … Read more

कार अपघातात महिला ठार, पाचजण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

Karad Accident News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी गुरु पौर्णिमेदिवशी घडली. देवदर्शनासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त नाणीज या ठिकाणी कामोठे मुंबई येथील भोसले व मोरे कुटुंबीय आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते पार निघाले असताना … Read more

वांग नदीच्या पाणी पातळीत वाढ; NDRF च्या पथकाकडून आणेगावातील नदीकाठावरील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Karad News

कराड प्रतिनिधी । दोन दिवस मुसळधार पावसाने कराड तालुक्यात चांगलेच झोडपून काढले. रात्रीदिवस पडत असलेल्या पावसामुळे कराड तालुकयातील वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे आणेगावाला जोडणारा पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला. दरम्यान, याठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल होत या पथकाने गावातील तरुणांसोबत नदीकाठी असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले. यावेळी एडीआरएफ पथकातील जवानांसोबत गावच्या पोलीस पाटील सुनीता पाटील, … Read more

सडावाघापूर धबधब्याजवळ हुल्लडबाजांवर उंब्रज पोलिसांची कारवाई; 20 हजार दंड वसूल

Patan News 17

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठो मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. मात्र, यामध्ये युवकांकडून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार केले जात असून अशा हुल्लडबाजांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सडावाघापूर मार्गावर वाहतुकीचे नियम मोडून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर उंब्रज पोलिसांकडून कारवाई बडगा उगारण्यात आला. … Read more