महाराष्ट्रातील जनता गहारीचा डाग पुसून काढेल, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर हल्लाबोल

Karad News 20241028 222438 0000

कराड प्रतिनिधी | साताऱ्यातील आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, मनोज घोरपडे (महायुती), आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील (महाविकास आघाडी) या दिग्गजांनी तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून विराट शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कराड येथे आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. … Read more

कराडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर तणाव निवळला

Karad News 13

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा भाजपचे … Read more

कराड दक्षिण विधानसभेसाठी आज पृथ्वीराज चव्हाणांसह चौघांनी भरले अर्ज; 8 उमेदवारी अर्जांची विक्री

Karad News 12

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. २२ ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा महा विकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह चार उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली असल्याची … Read more

साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

कराड दक्षिणेतून पृथ्वीराज बाबांनी साधेपणाने तर उत्तरेतून मनोज घोरपडेंनी वाजत गाजत भरला अर्ज

Karad News 20241028 131744 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग; उंडाळे परिसरामध्ये बिबट्यासह २ बछड्यांचा धुमाकूळ

Karad News 11

कराड प्रतिनिधी | उंडाळेसह परिसरात मादी बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी – धुमाकूळ घातला आहे. उंडाळे तुळसण रस्त्यावर शनिवारी दिवसभरात दहा ते पंधरा दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंडाळे व तूळसण फाटा दरम्यान निगडीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात शनिवारी दिवसभरात बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी शनिवारी दिवसभरात अनेकदा … Read more

शेरेत 12 एकरांतील ऊस जळून खाक; भरदुपारी शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना

Karad News 20241028 091222 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शेरे येथील मारुती पाणंद शिवारात रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत १२ एकर ऊस जळाल्याने नुकसान झाले. भर दुपारी आग लागल्याने तिचा वणवा इतका मोठा होता, की काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सुमारे १२ एकर उसाचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले … Read more

कराड नजिक तासवडे टोलनाक्यावर साडेपाच कोटीचे सोने-चांदी ताब्यात; पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई

Karad News 20241028 072939 0000

कराड प्रतिनिधी | सातारा बाजूकडून कराड शहराच्या दिशेने निघालेल्या कारमधून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे सोने आणि चांदीची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून ती पकडण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संबंधित कार तसेच सोने व चांदी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू होती. … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांस मशीन हाताळणी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी ३ व ४ यांचे पहिले प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे नुकतेच पार पडले. यावेळी निवडणूकीदरम्यान काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत तसेच बीयु, सीयु, व्हीव्हीपॅट मशीन बाबत तपशीलवार माहिती दिली. प्रशिक्षण वर्गास कराड दक्षिण निवडणूक … Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कराडकर नागरी गौरव समितीकडून रॅली काढून राजवर्धनचा गौरव

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कुटुंबाच्या मजबूत पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर राजवर्धन पाटील याने तब्बल आठ वर्षे सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाला गवसणी घातली हा केवळ कराड तालुक्याचाच नव्हे, तर राज्याचा आणि देशाचा बहुमान आहे. त्यामुळे त्याला ब्रँड अँबेसिडर करून निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे निश्चित मतदानाचा … Read more

कराड दक्षिणेत मान सन्मान मिळेपर्यंत कोणाच्याही स्टेजवर जायचं नाही; अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ठरलं

Karad News 20241027 093728 0000

कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. अशात सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कराड दक्षिणेतील महायुतीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले तसेच … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास ठोकल्या बेड्या; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Karad News 8

कराड प्रतिनिधी । मलकापूर-आगाशिवनगर येथे गेल्या काही महिन्यांपासून घारफोड्याचे सत्र सुरु होते. दरम्यान, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा … Read more