वहागावातील बेपत्ता झालेल्या ‘ति’चा सात तासात पोलिसांकडून शोध

Karad News 20240919 081247 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील झोपडपट्टी मधून अकरा वर्षे वयाची मुलगी शनिवारी संध्याकाळी अचानक घरातून निघून गेली होती. त्या मुलीचा तळबीड पोलिसांकडून तातडीने शोध घेण्यात आला. रविवारी संध्याकाळी सात वाजता सदर मुलीला आई-वडिलांकडे सुखरूप पोहोच करण्यात आले. तळबीड पोलिसांच्या कामगिरीचे जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख व कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कौतुक केले … Read more

कराड होतंय ‘ग्रीन सिटी’; लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के वृक्ष

Karad News 20240918 163221 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरात तशी पहिली तर वृक्षांची संख्या ही जास्त आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी कराड पालिकेकडून वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी ३७ हजारांपेक्षा जास्त वृक्षसंख्या होती. मात्र, त्यावेळी तीन मीटरपेक्षा कमी उंचीचे वृक्ष मोजण्यात आले नव्हते. सध्या या वृक्षांची उंची वाढली असून, एकूण वृक्षसंख्या पन्नास हजारांवर पोहोचली असल्याची समाधानकारक बाब पालिकेच्या पाहणीतून समोर आली … Read more

कराडात रात्री बारानंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने

Karad News 20240918 085320 0000

कराड प्रतिनिधी | काल मंगळवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गणेश मूर्ती विसर्जना दरम्यान कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री बारा वाजल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली असता एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या … Read more

कराडात गणपती विसर्जन निमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Karad News 20240915 204125 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरामध्ये गणपती विसर्जन हे विविध सार्वजनिक गणेश मंडळाकडुन केले जाते. विसर्जन पाहण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातुन अबाल वृध्दांची तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तसेच वाहतुकीची कोंडी होवु नये याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. या पार्श्वभूमीवर दिनांक १७/०९/२०२४ व १८/०९/२०२४ रोजी कराड शहरामध्ये बदल करण्यात येत … Read more

कराडसह परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले 92 जण हद्दपार

Crime News 20240915 164352 0000

कराड प्रतिनिधी | कराड पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर तब्बल 92 जणांवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. गणेश विसर्जन शांततेत व आनंद वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वजनिक गणेशोत्सव मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सवा दरम्यान गोंधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या तसेच … Read more

‘दक्षिण मांड’च्या सिंचन सर्वेक्षणासाठी 1 कोटी 65 लाख निधी मंजूर; डॉ. भारत पाटणकर

Dr. Bharat Patanakar News 20240915 145114 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून एक कोटी ६५ लक्ष रुपये मंजूर असून, लवकरच सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी म्हंटले. कोल्हापूर येथील सिंचन भवन येथे कृष्णा खोरे कोल्हापूर अधीक्षक अभियंता व अधिकारी यांच्यासोबत डॉ. पाटणकर … Read more

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आज झाली चाचणी; तिकीट दर किती?

Satara News 20240914 182602 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. ठिकठिकाणी प्रवाशांनी ‘वंदे भारत’वर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. कराड … Read more

मुंबई-कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ लवकरच; आज एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार

Satara News 20240914 110313 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबई – कोल्हापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांना मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान दिली. त्यामुळे मिरज आणि कोल्हापूर फास्ट ट्रॅकवर येणार आहे. दरम्यान, आज (शनिवारी) मिरज-पुणे-मिरज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या … Read more

याला म्हणतात प्रामाणिकपणा! भंगार गोळा करणाऱ्या महिलेने परत केली लाखो रुपयांची सोन्याची माळ

Karad News 20240913 192155 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रीतीसंगम परिसरात गणेश विसर्जन करताना कराडमधील गोठे येथील अधिकराव दिनकर पवार यांच्या गणेशाच्या गळ्यातील दहा तोळ्याची सुमारे आठ लाख रुपये किंमती माळ नदीत पडली. ही माळ त्याठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहा फकीर यांना सापडली. ही माळ त्यांनी सोनारामार्फत पोलिसांना संपर्क करून माळ अधिकराव यांना परत केली. नूरजहा यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र … Read more

मल्हारपेठ ते कोळोली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 20240913 131140 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व प्रकल्पांचे लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे. त्यामुळे मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दि. 29 सप्टेंबर रोजी पाटण … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावच्या प्राचीने मिळवलं ‘गोल्ड मेडल’

Karad News 20240913 113440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे गावच्याप्राची अकुंश देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत 3 हजार मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे. प्राचीने केलेल्या या कामगिरीमुळे किरपे गावासह जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नई येथे सध्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत अवघ्या 9 … Read more

कराड विमानतळ परिसरात साडे दहा किलो गांजा जप्त, दोघांना अटक

Crime News 20240913 065521 0000

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या काळात गांजासारख्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. कराड विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय. राहूल मोरे … Read more