महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का?; कराडात सुषमा अंधारे यांचा सवाल

Karad News 34

कराड प्रतिनिधी । एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या – आमच्या विकासाचे बोलत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. याचा नीट विचार करा. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत की, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली. सरकारी योजनेवर हे … Read more

साताऱ्यात 6 मतदार संघाचा तिढा सुटला मात्र, दोनचा घोळ कायम; भाजपकडून महायुतीत आणखी एकासाठी प्रयत्न

Satara News 20241025 214328 0000

सातारा प्रतिनिधी | सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हातील आठ विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये अजूनही घोळ सुरू आहे. सहा मतदार संघाचा तिढा सुटला असला तरी फलटण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजून वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान, महायुतीकडून कराड उत्तर साठी प्रयत्न केले जात असून सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जागा आलेला भाजप हा मोठा ठरलेला … Read more

कराड दक्षिणमध्येच मतदार यादीवर तब्बल 4 हजारांवर हरकती

Karad News 20241011 214553 0000

कराड प्रतिनिधी | निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर आजपासून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, … Read more

कराडात ‘बळीराजा’चे खर्डा-भाकरी आंदोलन; कारखानदारांचा निषेध करत प्रशासना विरोधात घोषणाबाजी

Karad News 73

कराड प्रतिनिधी । ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा. तसेच चालू हंगामाची उचल चार हजार रुपये मिळावी, या मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी कराड येथील तहसील कार्यालयासमोर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर कारखानदारांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, सातारा … Read more

कराडात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; 34 पथकांची नियुक्ती

Karad News 49

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा या महिन्यात होणार असल्याने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. कराड उत्तर व दक्षिण विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे निवडणुकीशी संबंधित विविध पथकांसाठी प्रशिक्षणवर्ग नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षणवर्गासाठी दोन्ही मतदारसंघांतील पथकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कराड उत्तर व … Read more

हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

Karad News 21

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणसाठी आणला पाच कोटीचा निधी; कराड दक्षिणमधील 64 कामांचा समावेश

Karad News 20240808 170322 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला. यामध्ये मतदारसंघातील ६४ विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गाव अंतर्गत मूलभूत सुविधांच्या … Read more

पाईपलाईन वाहून गेल्यानं कराड शहरात ‘पाणीबाणी’, कॉंग्रेस, भाजपचे नेते पोहोचले थेट ‘पंपिंग स्टेशनवर!’

Karad News 29

कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणी पुरवठा करणारी साईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. या पाणी समस्येवाट तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी थेट पंपिंग स्टेशन गाठलं. ऐन पावसाळ्यात कराडकरांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. कराड शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे ही … Read more

टोलवसुली बंद करण्यासाठी उंंब्रजसह परिसरातील ग्रामस्थांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

Karad News 20240707 174535 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तासवडे येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून होत असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी आज दुपारी खासगी चारचाकी, प्रवासी, मालवाहतूक वाहनांसह टोल नाक्यावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर वाहने उभी करुन आंदोलन केले. टोल प्रशासनाने आडमुठी भूमिका न सोडता स्थानिकांची टोलवसुली सुरूच ठेवल्याने आज स्थानिकांनी वाहनांसह मोर्चा काढून टोल प्रशासनाला जाब विचारण्याचा … Read more

कराडात युवकाशी झाला वाद, महिला पोलिसाने थेट पकडली कॉलर

Karad News 20240630 075245 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील कोल्हापूर नाक्या नजीक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दुचाकीस्वार युवक आणि महिला वाहतूक पोलिसात वाद झाला. या वादावादीवेळी संबंधित महिला पोलिसाने कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे. तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसाने केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ – अधिकाऱ्यांसमोर चौकशी … Read more

जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सोमवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलेच नुकसान केले. कराड, पाटण तालुक्यात पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी … Read more

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदान, पारा कमी होताच वाढल्या मतदारांच्या रांगा

Satara News 20240507 180957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळच्या वेळी जिल्ह्यात राजकीय मंडळींनी व काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदानाची नोंद झाली. कराड तालुक्यात मतदानासाठी महिलांमध्ये चांगला उत्साह वाढलेला … Read more