सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 323 पदांवर भरती; दहावी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना करता येणार अर्ज

Satara News 78

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नोकरीच्या अनेक संधी आहेत. अशीच एक सरकारी नोकरीची संधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara DCC Bank Recruitment 2024) उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

सातारा जिल्हा परिषदेमध्ये ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू

Satara News 49

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद (Satara ZP Recruitment 2024) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

रयत शिक्षण संस्था अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक पदावर मोठी भरती; थेट द्या मुलाखत

Karad News 1 3

सातारा प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, कराड येथे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more

सातारा झेडपी भरती परीक्षेस 553 जणांची दांडी

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेकडील विविध पदांच्या पदभरतीसाठी जिल्ह्यातील तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. तब्बल 1 हजार 325 उमेदवारांनी परीक्षा दिली असून 553 परीक्षार्थींनी दांडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रत्यक्ष परीक्षेला प्रारंभ झाला. कनिष्ठ अभियंता स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा … Read more

सातारा जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरु

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विविध संवर्गासाठी परीक्षेचे … Read more

सातारा जिल्हा रुग्णालयातील भरतीबाबत आरोग्य उपसंचालकांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात असलेल्या मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. आवश्‍यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल, अशी महत्वाची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सातारा जिल्हा रुग्णालयाच्या 15 वॉर्डसह बाह्य रुग्ण विभागाचा काल डॉ. राधाकिसन … Read more

सातारा ZP नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून होणार सुरु; 5 संवर्गासाठी परीक्षा होणार

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद भरतीचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. संबंधित भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा हा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातही ३ केंद्रांवर या परीक्षा होत असून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरू केली आहे. … Read more

सातारा जिल्हा परिषद भरतीचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु…; पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी झाली परीक्षा

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद वर्ग 3 ची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ सहाय्यकांची झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 8 संवर्गाच्या या परीक्षेनंतर आता उद्या दि. 15 आॅक्टोबरपासून परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यामध्ये सातारा … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षेला शनिवारपासून सुरुवात

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील परीक्षेस अखेर मुहुर्त लागला आहे. शनिवार, दि. 7 आॅक्टोबरपासून याची प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी परीक्षा होत असून ती 11 आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील 972 पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून 5 ते 25 आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने … Read more