जावळी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; पोटच्या मुलानं केलं असं काही…

Jawali News 20240804 222651 0000

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाने जन्मदात्रीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी जावळी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सातारा जिल्हा हादरून गेलाय. जावळी तालुक्यातील एका गावात व्यसनी मुलाने आपल्या आईवरच अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी … Read more

जावळीच्या रांजणीवर भूस्खलनाचा धोका, घोटेघर-सुलेवाडीतील डोंगराला मोठमोठ्या भेगा

Satara News 20240730 102139 0000

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाची संततधार कायम असून जमीन घसरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. जसजसे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतसे पावसाचे पाणी या भेगांमध्ये जाऊन या भेगा रुंदावत चालल्या आहेत. डोंगरात रुंदावत चाललेल्या या भेगांमुळे २५ ते ३० एकराचा डोंगरच रांजणी गावाच्या दिशेने घसरत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरावर असलेल्या सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भीतीच्या छायेखाली … Read more

जावळी तालुक्यात साथरोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 20240729 155200 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या … Read more

सातारा जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट; पाटण जावळीसह महाबळेश्वरमधील 700 कुटुंबे स्थलांतरित

Satara Rain News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना … Read more

आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन; डॉ. भारत पाटणकर यांचा राज्य सरकारला इशारा

D. Bharat Patanakar News 20240720 220457 0000

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती, घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही व ज्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही पुढील महिन्यात आंदोलन करून आमचा विजय मिळवल्या … Read more

सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख मंजूर

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 26 ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार आहेत. कारण या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

जावळी तालुक्यात कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यानं केली आत्महत्या

Crime News 20240704 130323 0000

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील बेलावडे येथील युवा शेतकऱ्याने तणनाशक पिऊन राहत्या घरातच मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली आहे. अनिल चंद्रकांत शिंदे असे शेतकऱ्याचे त्यांचे नाव आहे. कर्जवसुलीसाठी खासगी संस्थेने लावलेल्या तगाद्यामुळे अनिल त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सागितलं जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चंद्रकांत … Read more

संत सोपानदेव महाराज पालखी ओढण्याचा महाडिकांच्या ‘देवा’ बैलाला मिळाला मान

Satara News 71

सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागामधील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांच्या ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

Wai News 20240422 211452 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास … Read more

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने दिला ‘हा’ इशारा

Satara News 23 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी राष्ट्रवादीस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला आहे. तसेच यापुढेही विश्वासात न घेतल्यास कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला … Read more

जावळीत शेतजमिनीच्या रस्त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240403 110940 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा … Read more

जावळी तालुक्यात बिबट्याकडून 3 कुत्र्यांचा फाडशा

Leopard News 20240326 122212 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मालचौंडी ता. जावली आणि परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याने आतापर्यंत गावातील तीन पाळीव कुत्र्यांचा फाडशा पाडला असून विभागात भितीचे आहे तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे. बिबटयाच्या मुक्त संचारा दरम्यान बिबट्याने हल्ला केलेली तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेली … Read more