महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी गावातील एका हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती प्रशासनास दिली असून अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी … Read more

हॉटेलमधील फिश टँकमध्ये पाळले होते मऊ पाठीचे कासव, वन विभागाने छापा टाकून घेतलं ताब्यात

Crime News 20240610 203724 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वन विभागाने एका हॉटेलमधून मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले आहे. दुर्मिळ वन्यप्राणी हॉटेलमधील फिश टॅकमध्ये पाळल्याने वन विभागाने ही कारवाई केली. तसेच याप्रकरणी वन्यजीव अधिनियमान्वये हॉटेल मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी-मोरेवाडी, ता. महाबळेश्वर) याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर तापोळा मार्गावर असलेल्या निलमोहर अॅग्रो रिसॉर्टमधील फिश टॅकमध्ये भारतीय … Read more

विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर कारवाई; प्रशासनाकडून बार सील

20240531 081319 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. अशातच आता अल्पवयीन मुलाच्या बापाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याच्या MPG क्लब मधील अखेर गुरुवारी रात्री बार सील करण्यात आला. हा बार अनधिकृत असल्याचं समोर आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा अग्रवाल कुटुंबीयांना मोठा … Read more

AC रूममध्ये राहिला अन् बिल न देता पळाला; जकातवाडीतील एकावर गुन्हा

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी | हाॅटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आॅनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील एका हाॅटेलात घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जकातवाडीच्या एकावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी चंद्रसेन धनंजय जाधव (रा. पोवईनाका सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पंकज गणपत बाबर (रा. … Read more

जिल्ह्यात हाॅटेल्स, ढाब्याच्या वेळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय; आता ‘ही’ वेळ होताच होणार शटर डाऊन

Satara News 11 1 jpg

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या वेळी हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याचा विचार करुन पोलिस अधीक्षका समीर शेख यांनी रात्री १० पर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास तर ११ : ३० वाजेपर्यंत आस्थापना बंद करण्याचा मोठा निर्णय जारी केला आहे. यामुळे यापुढे संबंधितांना वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा … Read more

रात्री सुरु होती छमछम…नोटा उधळत असताना अचानक पोलीस पोहचले; युवतींसह हॉटेल मालकाची धावाधाव

Crime News 6 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील पेट्री येथील राज कास हिल रिसोर्टवर सातारा तालुका पोलिसांच्‍या पथकाने शनिवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सहा बारबाला व त्यांच्यासोबत नाचणारे १८ जण, हॉटेल मालकासह २१ जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पोलिसांच्या या धडक कारवाईत ८३ हजारांची रोकड, मोबाईल हँडसेट, साउंड सिस्‍टिम, डिस्‍को लाइट असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. याप्रकरणी गुन्‍हा नोंद … Read more

वाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची हॉटेलवर धाड; हॉटेल चालकासह 10 जणांना अटक

Wai Crime News 20231008 081350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

Satara News : साताऱ्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकीची तोडफोड

Satara Crime News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी कोयता गँगकडून एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केल्याची घटना काल बुधवारी … Read more