सातारा शहर परिसरात पोलिसांचे 12 जुगार अड्ड्यांवर छापे; 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Satara News 20241230 070629 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणच्या 12 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 13 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वैभव विश्वनाथ कोल्हे (वय 22, प्रतापसिंहनगर), आशिष अशोक नेवसे (32, रा. सैदापूर, ता. सातारा), अमितकुमार विश्रांत माने (45, रा. गिरवाडी, ता. पाटण), … Read more

फलटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची ‘या’ दिवशी आरक्षण सोडत

Phalatan News 20241230 064907 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील आदेशानुसार फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभागृह, फलटण येथे काढण्यात येणार आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती तसेच सन २०२५ या वर्षात नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग … Read more

जयपूरात भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक; दुचाकी चालक ठार

Satara News 20241228 203429 0000

सातारा प्रतिनिधी | रहिमतपूर-औंध मार्गावरील जयपूर, ता. कोरेगाव येथे भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक बसली. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला असून या घटनेची रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. विक्रांत शंकर लिगाडे (वय 27, मूळ राहणार वाघोलीवाडी, सध्या राहणार सदर बझार सातारा) असे … Read more

लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून अभिवादन

Satara News 20241228 191409 0000

सातारा प्रतिनिधी | शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथील अमर जवान स्मृतीस्तंभावर वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले. यावेळी सैनिक स्कुल साताराचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन, सातारा नगरपालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा … Read more

राष्ट्रीय महामार्गावरील ‘या’ सुविधांचा आराखडा तयार करण्याच्या मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना

Satara News 20241228 181925 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरमहिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे … Read more

पोलीस अधीक्षक समीर शेख यांची दुर्गम जुंगटी गावास भेट; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांशी चर्चा

Satara News 20241228 132339 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कास पठारावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जुंगटी (ता. सातारा) गावास नुकतीच भेट दिली. यावेळी शेख यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद देखील साधला. यावेळी ग्रामस्थांसोबत सहवास, गप्पा, गावातच केलेल्या मुक्कामातून समीर शेख यांना जुंगटी गाव भावले. सातारा तालुक्यातील जुंगटी हे कास परिसरातील एक दुर्गम गाव असून कास, जुंगटी, बामणोली, … Read more

सैदापुरात कुटुंबावर गोळीबार; वडिलांसह मुलगी झाली गंभीर जखमी

Crime News 20241228 120202 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलमागे असलेल्या सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एकाने कुटुंबावर गोळीबार केला. त्यामध्ये वडिलांसह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी सावधगिरी बाळगत शिताफिने … Read more

डीवायएसपींच्या पथकाचे कराड-मलकापुरातील कॅफेंवर छापे, चालक-मालकांवर गुन्हे दाखल

Crime News 20241227 214229 0000

कराड प्रतिनिधी | उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी कराड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका सुरू केला. चार स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या छाप्यात सापडली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची … Read more

संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का?: विलासबाबा जवळ यांचा मद्य धोरणावरून मंत्री अजितदादांना सवाल

Satara News 20241227 153122 0000

सातारा प्रतिनिधी | मागील उत्पादन शुल्कमंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याशिवाय दारूच्या दुकानांची खैरात वाटली. आता नवीन उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मद्याची दुकाने वाढविण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे संत-महंतांची ही भूमी मद्यासुरांची करायची आहे का? असा सवाल करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करण्याऐवजी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम हे सरकार व त्यांचे मंत्री करत आहेत, … Read more

कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रात 5 दिवस प्रवेश बंद; नेमकं कारण काय?

Koyna News 20241227 131003 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना व हेळवाक वनपरिक्षेत्रात २८ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप व … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार : आ. शशिकांत शिंदे

Satara News 20241227 121317 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संघटनात्मक बांधणी नव्याने करणार आहे. आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्ण ताकदीने लढणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते आ.शशिकांत शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी भवनात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, जिल्हा बँक … Read more

कराडच्या तासवडेत पोलीसांनी पकडला 10 लाखांचा गुटखा जप्त

Karad News 20241227 085533 0000

कराड प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी टेंपोसह दहा लाख ३० हजार रुपयांचा गुटखा पकडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. विकास वसंत जाधव (वय ३५, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की महामार्गावर शनिवारी … Read more