कराडातील ऐतिहासिक मनोऱ्यास DYSP अमोल ठाकूर यांनी दिली भेट; केली ‘या’ उपक्रमास सुरुवात

Karad DYSP Amoll Thakur News 20230924 231031 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरात अनेक एतिहासिक वस्तू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एतिहासिकपैकी जामा मशीद येथील मनोरे होय. या मनोऱ्यास आज कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मनोऱ्यामध्ये सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पाहणी केली. तसेच एतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे ठाकूर … Read more

सातारच्या किल्ले अजिंक्यतारावरून कोसळला दगड; दरीमुळे टळली मोठी दुर्घटना

Satara Ajinkytara Fort News 20230924 202625 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड धोकादायक स्थितीत उभे आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, हे दगड वसाहतींच्या दिशेने कोसळण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान, रविवारी दुपारी एक भला मोठा दगड किल्ल्यावरून वसाहतींच्या दिशेने कोसळला. उंचावरून आलेल्या या दगडाचा वेग जास्त असल्याने डोंगर उतारावरील 2 झाडे उन्मळून पडली. हा … Read more

सातारा वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास होणार सुकर

Satara Police News 20230924 175022 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव व अन्य सर्व प्रकारच्या बंदोबस्तावेळी वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करत असतात. शासनाच्या वतीने त्यांना योग्य त्या सेवा सुविधा मिळत असतात. त्यातून सामाजिक बांधिलकी म्हणून रयत स्वाभिमानी संघटनेचा सातारा येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना शूज भेट देण्यात आले. यावेळी सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक … Read more

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 20 जण तडीपार; 32 जणांकडून वर्तणुकीबाबतचा बॉंड

Pusegaon Police Station 20230924 140837 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. तर 32 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉंड पुसेगाव पोलिसांनी लिहून घेतला घेण्यात आहे. पुसेसावळी या ठिकाणी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जाळपोळ व दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा : डॉ. अतुल भोसले

Dr. Atul Bhosale News 20230924 131232 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ज्या जनहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजना भाजपाच्या बूथ प्रमुखांनी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड दक्षिण मतदारसंघातील ३०८ बुथचे प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या व्यापक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे … Read more

दिव्यांगांच्याप्रती शासन संवेदनशील असून अन्याय करणार नाही : पालकमंत्री शंभूराज देसाई

20230924 123039 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दिव्यांगांच्या प्रती शासन संवेदनशील आहे. निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला असला तरी शासन अन्याय करणार नाही. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या अटी शर्ती असाव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. अंध व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमिन देण्याबाबतच बैठक पालकमंत्री शंभूराज … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील दर्ग्यात ‘गणपती बाप्पा मोरया’!

Khatgun News 20230924 104234 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात हिंदू व मुस्लिम या दोन धर्मातील सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. त्यातील एक म्हणजे सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या खटाव तालुक्यातील खातगुण या गावात असलेल्या दर्ग्याच्या आवारातच गेल्या 45 वर्षपासून विघ्नहर्ता गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण हे … Read more

अनंत चतुर्दशी अन् ईद एकोप्याने साजरा करा : बापूसाहेब बांगर

Umbraj News 20230924 100328 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा पोलीस दल आणि वडूज पोलीस ठाणे यांच्यावतीने गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद या सणांच्या निमित्ताने जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक उंब्रज येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी अनंत चतुर्दशी तथा गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक आणि पवित्र ईद असे दोन्ही सण गुरूवार, दि. … Read more

कराड-ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा जागीच मृत्यू

Fox Death News 20230924 000600 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यातील मृत कोल्ह्यास शनिवारी सकाळी वन विभागाने ताब्यात घेतले. कराड – ढेबेवाडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्यापासून वाहनांचा वेग जास्तच वाढला आहे. या मार्गावरून अती वेगाने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. परिणामी कमी … Read more

उपोषण मागे घेण्याची पालकमंत्र्यांची विनंती धुडकावली; सोमवारी धनगर बांधवांकडून ‘माण’ बंदची हाक

Dhanagar News 20230923 212625 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दहिवडी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. हे उपोषण मागे घ्यावे, ही पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे केलेली विनंती धुडकावून लावत उपोषणकर्त्यांनी सोमवारी माण तालुका बंदची हाक दिली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा … Read more

गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणत काही क्षणात शाळकरी मुलानं उचलल टोकाचं पाऊल!

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी | सद्या गणपती उत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे सर्वत्र तरुण मंडळांमध्ये गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावत आहेत. यामध्ये अगदी लहान बालकांपासून ते वयोवृध्द सहभागी होत आहेत. मात्र, सातारालगत असलेल्या कोंडवे गावात एक धक्कादायक घटना घडली. क्लासवरून आल्यानंतर सहावीतल्या मुलाने शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,’ असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. … Read more

लोकनेते देसाई कारखान्याचा कमी गाळप क्षमता असणार्‍या कारखान्यांच्या बरोबरीने दर; पालकमंत्र्यांचा दावा

Shambhuraj Desai News 20230923 173623 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | राज्यात 1250 मेट्रिक टन गाळप क्षमता असणार्‍या अनेक कारखान्यांच्या बरोबरीने दर देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रेसर ठरला असल्याचा दावा पालकमंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक शंभूराज देसाई यांनी केला. तसेच राज्यातील सरकार हे साखर कारखानदारीच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची 53 वी वार्षिक … Read more