खा. उदयनराजेंनी आज घेतली केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदीयांची भेट; जिल्ह्यासाठी केल्या ‘या’ मागण्या

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । लोकसभेच्या अधिवेशनामुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) सध्या नवी दिल्लीत आहेत. नवी दिल्लीत असल्याने खा. भोसले यांच्याकडून सातारा जिल्ह्यतील विविध प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदने देत प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली जात आहे. दरम्यान, आज नवी दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया … Read more

वांग – मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; ‘या’ 4 तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार लाभ

Karad News 14

कराड प्रतिनिधी | कराड, पाटण व सांगली जिल्ह्यातील कडेगाव व खानापूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या वांग- मराठवाडी धरणातून कालपासून वांग नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेतला असून, या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे. पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी … Read more

कराड पोलिसांनी शहर परिसरात रोखला बालविवाह; निर्भया पथकाकडून मुलीचे समुपदेशन

Karad News 13 1

कराड प्रतिनिधी । कराड शहर परिसरातील एका गावात गुरुवारी अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करीत बाल विवाह लावणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीचा विवाह खटाव तालुक्यातील युवकाशी ठरविला होता. त्यांच्या याद्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत; 7 महिन्यात शेकडो जनावरांवर हल्ला

Karad News 12 1

कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात बिबट्यांचे हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत शेकडो पाळीव जनावरांचा त्यांनी फडशा पाडला आहे. तर काही ग्रामस्थांवरही यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पाळीव जनावरांची बिबट्याने शिकार केल्यास संबंधित शेतकऱ्याला वन विभागाकडून भरपाई देण्यात येतेच. मात्र, आता बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देण्यात येणाऱ्या भरपाई रक्कमेत मोठी … Read more

सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न आमदार शशिकांत शिंदेंकडून हिवाळी अधिवेशनात उपस्थित

Satara News 16 1

सातारा प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिनादिवशी संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दुध आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून चौदा मागण्या मांडून … Read more

करिअर मेळाव्याचे 1 अन् 2 जानेवारी रोजी आयोजन; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केलं आवाहन

Satara News 15 1

सातारा प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस योग्य दिशा मिळावी यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 जानेवारी 2025 या कालवधीत यशोदा टेक्नीकल कॅम्प, सातारा येथे करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पालकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

सातारा ते लंडन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक पदव्यांची यादी व्हायरल

Satara News 14 1

सातारा प्रतिनिधी । देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत नुकतीच एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये बराच वाद उफाळून आला आहे. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनी संसदेत केंद्रीय मंत्री शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी त्वरित माफी मागावी तसेच बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली … Read more

सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके

Satara News 20241220 100325 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणार्‍या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरूग्ण शोधमोहिम राबवली जात आहे. दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर राबविण्यात येणाऱ्या क्षयरूग्ण शोध मोहिमेत शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी 160 पथके तयार केली असून शहरी व ग्रामीण … Read more

डंपरच्या हौदाखाली सापडून कालेतील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Crime News 20241220 085155 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील धोंडेवाडी फाटा येथे डंपरमधील ग्रीट उतरत असताना डंपरचा हौदा उलटल्याने त्याखाली सापडून सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, सुरक्षा रक्षकाचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. देवानंद मारुती पाटील (वय ४८, रा. काले, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की धोंडेवाडी फाटा येथे … Read more

जिल्ह्यात कृषी विकासाला चालना द्या; उदयनराजेंनी घेतली केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट

Satara News 20241220 083644 0000

सातारा प्रतिनिधी | केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी काल भेट घेतली. यावेळी ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सामूहिक शेती, सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी सातारा जिल्ह्यातील विविध योजनांना केंद्राने भरभक्कम पाठबळ द्यावे. जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन केंद्रांची उभारणी करावी, अशी … Read more

महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटवरून 550 फूट खोल दरीत उडी मारून एकाची आत्महत्या

Crime News 20241219 222103 0000

सातारा प्रतिनिधी | मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरातील लॉडविक पॉईंटवरून एका व्यक्तीने 550 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. गंभीर जखमी झाल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेमुळे महाबळेश्र्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संजय वेलजी रुघाणी (वय 52 रा.शांतीनगर, मिरा … Read more

कराड नगरपालिकेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची दखल

Karad News 11 1

कराड प्रतिनीधी | कराड नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षात स्वच्छ सर्वेक्षणासह विविध उपक्रमात देशपातळीवर अव्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कराड नगर पालिकेने (Karad Municipality) उत्तम कामगिरी केली आहे. याचे फलित म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) मधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल दिल्ली … Read more