जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रोकड, मद्य, वाहनांसह 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त, 45 जणांवर गुन्हा नोंद

crime News 20241103 093040 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिरवळ हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, … Read more

जिल्ह्यातील धरण परिसरातील ‘त्या’ बांधकामांवर कारवाई करा; सुशांत मोरे यांनी केली मागणी

Satara News 20241031 164106 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील धोम, कोयना, कण्हेर आणि उरमोडी धरणांच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांवर तातडीने कारवाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ॲड. तृणाल टोणपे, ॲड. निकिता आनंदाचे यांच्यामार्फत सातारा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहायक वनसंरक्षक तसेच पर्यावरण, वन … Read more

शशिकांत शिंदेंच्या ‘त्या’ संशयानंतर महेश शिंदेचे 500 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचे आव्हान; नेमकं प्रकरण काय?

Satara News 20241031 161600 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील पाटखळ येथे मंगळवारी (दि. २९) दोन एकर ऊस जळून एका शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर राजकीय वातावरण तापले असून, आमदार शशिकांत शिंदे यांनी हे विरोधकांचे कृत्य असू शकते, असा संशय व्यक्त केल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्यावर आपण ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आव्हान दिले आहे. … Read more

ऐन दिवाळीत साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्याना पावसाचा येलो अलर्ट

Satara News 33

सातारा प्रतिनिधी । कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक पावसात भिजले आहे. अश्यात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने पुणे, … Read more

पंढरपूर रस्त्यावरील बरड गावच्या हद्दीत पहाटे भीषण अपघात; 3 ठार तर गाडीचा झाला चक्काचूर

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । दिवाळीच्या सणादिवशी एक भीषण अपघाताची घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील पंढरपूर रस्त्यावर बरड गावच्या हद्दीत चार चाकी गाडीचा पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील … Read more

पाटण मतदार संघातील छाननीत 4 उमेदवारांचे अर्ज बाहेर; अपक्ष तीन उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रच सादर नाही

Patan News 3

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा २६१ मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांचे ३१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाहेर निघाले. यापैकी सौ. स्मितादेवी शंभुराज देसाई यांचा अर्ज मंत्री शंभुराज देसाई यांना मिळालेल्या पक्ष्याच्या नामनिर्देशन पत्रात प्रस्तावकासह बदली (दुय्यम) नामनिर्देशन पत्र असल्याने ते शंभुराज देसाई यांच्या अर्जासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. … Read more

निवडणूक विषयक तक्रारी करायची आहे मग करा ‘या’ व्यक्तींना फोन; निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

Satara News 32

सातारा प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत सर्व निवडणूक निरीक्षक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. यावेळी रोकड वाटप अथवा अन्य प्रलोभने अथवा, अन्य गैर प्रकार आढळल्यास सिव्हीजील ॲप, जिल्हा प्रशासन, निवडणूक निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी … Read more

जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरंगी तर 2 मतदारसंघांत तिरंगी सामना; बंडखोरांमुळे चुरस वाढली

Satara News 31

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांत पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आलेले आहेत, तर काही ठिकाणी नवीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. तरीही ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच होणार आहे. त्यातच काही मतदारसंघांत बंडखोरीही झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे गणित बदलण्याचीही शक्यता आहे. आठही विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल झाले असून, … Read more

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विनापरवाना सोयाबीन खरेदी करणार्‍यांवर कारवाई

Crime News 20241031 094957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्‍या व्यापार्‍यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्‍यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. बाजार समितीचा … Read more

त्रिपुटी खिंडीत अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

Crime News 20241031 090330 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर त्रिपुटी खिंडीजवळ अपघाताची घटना घडली असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुटी खिंडीत दुकाचीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोन जण ठार झाले. राहुल अंकुश जाधव (रा. ल्हासुर्णे) असे एका मृताचे नाव असून, दुसऱ्याचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. आज सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. खिंडीच्या … Read more

कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याच्या रागातून बँक मॅनेंजरवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, संशयिताला अटक

Crime News 20241031 072044 0000

कराड प्रतिनिधी | साताऱ्यात इंडियन ओवरसीज बॅंकेच्या मॅनेजरवर तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शेळी पालनासाठी कर्ज लवकर मंजूर होत नसल्याच्या रागातून तरुणाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कराड शाखेतील मॅनेंजरवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आशिष कश्यप (मूळ रा. बिहार) हे गंभीर … Read more

कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून केली मतदान जागृती; विधानसभेला मतदान करण्याचे आवाहन

Voting Awareness News

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मधील 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सुनील परीट, पथक कर्मचारी आनंदराव जानुगडे, संतोष डांगे, ऋषिकेश पोटे, सचिन चव्हाण यांनी कमी मतदान झालेल्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये मतदान जागृती केली. मतदान करणे हे आपले … Read more