कराड उत्तरमध्ये भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनां दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

Karad News 20241029 210343 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. महादेवराव साळुंखे यांनी कराड उत्तर मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांचं टेन्शन वाढलं आहे. याशिवाय मूळ कराड उत्तर मधील रवींद्र सूर्यवंशी (अजित पवार गट), सोमनाथ चव्हाण आणि संतोष वेताळ यांनी देखील अपक्ष अर्ज … Read more

बिबट्याने हल्ला करून पाडला शेळी अन् बोकडाचा फडशा

Leopard Attacked News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्तपणे वावर सध्या वाढलेला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने शेळी व बोकड ठार केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर सोनाईचीवाडी येथे रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास सुरेश सखाराम अपशिंगे यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एका शेळीला ठार केले. सोबत असलेल्या बोकडाला … Read more

लेकीची शपथ घेऊन सांगा ‘तुतारी’वर लढवण्याचा शब्द दिला की नाही?; घार्गेना उमेदवारी देताच शेखर गोरेंचा पवारांवर निशाणा

Satara News 24 1

सातारा प्रतिनिधी । माण- खटाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सध्या चांगलेच टीकेचे फटाके उडू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जयकुमार गोरे यांच्या विरोधात आघाडीचा उमेदवार कोण राहील, याबाबत उत्कंठा लागून राहिली होती. ती उत्कंठा काल प्रभाकर घार्गे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने संपली. मात्र, त्याचे पडसाद मतदारसंघात उमटू लागले आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांना … Read more

विद्यार्थ्यांकडून आकाश कंदीलातून मतदान जनजागृतीचा संदेश; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेतील 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील … Read more

दिवाळीत फटाके उडवण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी केली महत्वाची अधिसुचना जारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून नुकतेच आदेश पारित करण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारु काम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे … Read more

मतदार जनजागृतीसाठी सातारला जिल्ह्यात शाळा, विद्यालयांमध्ये विविध उपक्रम

Satara News 21 1

सातारा प्रतिनिधी । राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनासह जिल्ह्यातील शाळांचाही पुढाकार दिसून येत आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांकडून मतदान जनजागृती फेरीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढावी व आपल्या एका मताला … Read more

निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांनी घेतला कराड दक्षिण मतदार संघाचा आढावा

Karad News 15

कराड प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज मंगळवारी २६०, कराड दक्षिण मतदार संघास निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांनी भेट दिली. यावेळी विविध विभागांची पाहणी केल्यानंतर गीता ए यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्रीमती गीता ए यांनी … Read more

राजकारणातील सर्वात मोठी बातमी; शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी नरेंद्र पाटलांची हजेरी

Political News 2 1

सातारा प्रतिनिधी । राजकारण म्हटलं कि एकमेकांचे कायमचे शत्रू असे काहीजण मानतात. मात्र, मोठ्या नेत्यांमध्ये राजकारण जरी होत असले तर त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कायम असतात. याचाही प्रचिती आज कोरेगाव विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठी घडामोड कोरेगाव विधानसभा मतदार संघात घडली आहे. महायुतीतील भाजपमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र समजल्या … Read more

वाईतून महायुतीकडून मकरंद आबांनी तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधवांनी भरला अर्ज

Wai News 2

सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत पहायला मिळांनार आहे. कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांनी देखील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मात्र, दोघांच्या नंतर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांनी … Read more

वाईतून शरदचंद्र पवार पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ यांनी भरला उमेदवारी अर्ज

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहे. वाई विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटीलयांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी … Read more

तमिळनाडूतील भूमीत आढळला शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा!, साताऱ्यातील इतिहास अभ्यासकांची कामगिरी

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक इतिहास अभ्यासकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक ठेव्याचे संशोधन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख दक्षिण दिग्विजयाचे इतिहास अभ्यासक अनिकेत वाघ, कुमार गुरव यांच्यासह अभ्यासकांनी शोधून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख तामिळनाडूतील भूमीत प्रकाशात आला आहे. … Read more

3 कोटी लूट प्रकरणातील मुख्य संशयित स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये झाला हजर

Karad News 14

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजिक तीन कोटी रुपये लुटल्याची घटना घडली होती. या दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कराड शहर पोलीस स्टेशनला स्वतःहन हजर हाजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दहा जणांना अटक केली आहे. दहा आरोपी कडून दोन कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये हस्तगत केल्यानंतर … Read more