अबब…! सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ लोकांना आले ‘डोळे’

Eye News 20230808 124332 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या डोळे येण्याची साथ जोरात असून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत. फलटण व सातारा तालुक्‍यात तर या डोळे आलेल्या रुग्णांनी शंभरीच पार केली असून जिल्ह्यात तब्बल 636 नागरिकांना डोळे आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 258 रुग्ण उपचारद्वारे बरे झाले असून सध्या 378 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. … Read more

जिल्ह्यातील अतिसाराच्या साथीबाबत शंभूराज देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Shambhuraj Desai 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. तथापि जिल्ह्यामध्ये अतिसाराची कोणत्याही प्रकारची साथ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी … Read more

कृष्णा हॉस्पिटलची आरोग्य दिंडी पंढरीच्या दारी; 25 जणांच्या पथकाने वारकऱ्यांना दिली आरोग्य सेवा

Arogya Dindi Krishna Hospital

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो दिंड्या पंढरपूरजवळ पोहचल्या आहेत. कराड तालुक्यातील अनेक दिंड्याही पंढरपूरसमीप पोहचल्या असून, परिसरातील अनेक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. या वारकऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या पथकाने वारी मार्गावर वैद्यकीय सेवा देत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. कराडसह वाळवा तालुक्यातील वारकरी श्री मच्छिंद्रनाथ … Read more

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; ‘इतक्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Satara Sant Shrestha Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi health

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्यात दि. 23 जून कालावधी पर्यंत राहणार आहे. सातारा जिल्ह्यातुन पालखी सोहळ्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी … Read more