हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र फडकला तिरंगा

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्‌देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत या अभियानांतर्गत आज … Read more

सातारा जिल्ह्यात 43 हजार 500 वृक्षांची लागवड; ‘इतक्या’ ग्रामपंचायतींनी केले उद्दिष्ट पूर्ण

Satara News 54

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत विविध ग्रामपंचायतींनी 43 हजार 501 वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये 105 ग्रामपंचायतींचे किमान 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत … Read more

सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख मंजूर

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 26 ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार आहेत. कारण या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

Satara News 20240711 084206 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याच्या ग्रामविकास विभागाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेकरता सातारा जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी … Read more

आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये झळकणार माहिती अधिकारासह नागरिकांची सनद

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये जन माहिती अधिकारी फलक लावले नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी पत्रव्यवहार करीत ग्रामपंचायत कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि नागरिकांची सनदचे फलक लावण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर वसुली निम्म्यावरच; ‘इतके’ टक्के झाली वसुली

Satara News 20240402 111531 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १ हजार ४९६ ग्रामपंचायतींच्या मागील थकित आणि यंदाच्या अशा एकूण १४४ कोटी ९७ लाख ७३ हजार २६ रुपये कर वसुलीपैकी यंदा फक्त ७८ कोटी ३३ लाख ५० हजार ४९६ रुपयेच वसुल झाले आहेत. त्याची सरासरी ५६ टक्क्यांवरच आहे. सातारा जिल्ह्यातील गावे एक हजार ४९६ आणि विस्तार अधिकारी फक्त ४२ अशी … Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक; 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार

Satara News 2024 02 26T130835.601 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ग्रामस्थांकडून विविध कररूपातून पैसे जमा होतात, तसेच 15 व्या वित्त आयोगातूनही निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायती मालामाल होत आहेत. परिणामी गावांचे रूपडे पालटू लागले आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ४९२ ग्रामपंचायतीं आहेत. त्यात वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक आहे. हा निधी 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा … Read more

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या 274 ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमात 29 हजाराहून नागरिकांचा सहभाग

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २७४ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात २९ हजार २८८ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत … Read more

पंधराव्या वित्त आयोगातून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 41 कोटी

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून 41 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना वेग येणार असून पेयजल पाणीपुरवठा, वॉटर सायकलिंग यासह विविध योजनांची रखडलेली कामे यामुळे मार्गी लागणार आहेत. ग्रामीण विकासासाठी 14 आणि 15 व्या वित्त आयोगाचा निधी महत्वपूर्ण ठरला आहे. या निधीतून गावोगावी विकासाची गंगा सुरु झाली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उद्यापासून करणार आंदोलन!

Shirval Grampachayat News 20231008 095519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवकांना अन्यायकारक व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी उद्या बुधवार (दि. १८) रोजीपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची कामे ठप्प होणार आहेत. दरम्यान, उद्यापासून करण्यात येणाऱ्या आंदोलन काळात सर्व ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत गावांमध्ये उपस्थित राहणार आहेत. मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आढावा … Read more

पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पुन्हां एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा!; पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने पुन्हां एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नाट्यमय राजकीय घडामोडींनतर पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटणकर गटाच्या विशाल निकम यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व … Read more