ज्या हातांनी घोरपडीची शिकार करून खाल्ले; त्याच हातात पडल्या बेड्या

Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घोरपडीची शिकार करून पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वनविभाग विभागाने संबंधित शिकारीवर कारवाई करत त्यास बेड्या ठोकल्या. सुनील विजय जाधव ( रा. गोपाळनगर-शेणोली, ता. कराड) असे वन विभागाकडून अटक … Read more

घोरपडीची शिकार केली अन् काही मिनिटांत सापळ्यात अडकले; ३ जण ताब्यात

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात घोरपड, ससे सारख्या प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील ढवळेवाडी (नेवसेवस्ती) येथील ढवळेवाडी-नांदल मार्गावर मांस खाण्याच्या उद्देशाने तीन संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केली. आणि पुढे जातो तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय शंकर रनवरे (वय … Read more

सह्याद्री साखर कारखाना हद्दीत सापडला बहेली सापळा

jpg 20230731 095010 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात शिकारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील शहापूर येथील सह्याद्री साखर कारखाना हद्दीत घडली. या ठिकाणी डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा हा रानात गेले असता त्याचा पाय शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील शहापूर … Read more

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वकिलाने केला थेट वनमंत्री मुनगुंटीवारांना फोन !

Adv. Mahadev Salunkhe Sudhir Mungantiwar News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वराडे गाव परिसरात मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन बिबटे असल्याची दृश्ये कैद झाली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता भाजपचे पदाधिकारी ॲड. महादेव साळुंखे यांनी आज थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. साहेब बिबट्याचा बंदोबस्त करा, … Read more

वर्धनगडावरील ‘ते’ अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले; पहाटेपासून राबविली कारवाईची मोहीम

Vardhangad News

कराड प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावरील दर्गा परिसरात असलेले अतिक्रमण आज पहाटेपासून पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवण्यास सुरुवात करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास पोलिस व वन विभागचे पथक वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाले. तसेच पोलीस व वनविभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडाच्या … Read more

खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक;930 ग्रॅम खवले केले जप्त

20230629 114417 0000

कराड प्रतिनिधी | खवल्या मांजराच्या खवल्याच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 930 ग्रॅम खवले जप्त करण्यात आले असल्याची घटना लोटे, ता. रत्नागिरी व सातारा जिल्हा हद्दीत नुकतीच घडली. मिलिंद सावंत (रा. मालाड, ता. रत्नागिरी व मीना कोटिया (रा. लोटे ता. रत्नागिरी) असे यांना ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव … Read more

मोराच्या अंगावरची पिसं काढून Video शेअर करून तरुण झाला होता फरार; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Accused From Madhya Pradesh Arrested

कराड प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील एका युवकाने मोराच्या अंगावरची पिसे उपसून त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. संबंधित आरोपी पाटण तालुक्यात आला होता. त्या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून एक युवतीसह आरोपीस पाटण तालुक्‍यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी आढळला दुर्मीळ जांभळी लिटकुरी पक्षी

purple little bird

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दुर्मिळ पक्षांचा वास आहे. जिल्ह्यातील वन हद्दी क्षेत्रात असे पक्षी आढळून येतात. सध्या जिल्ह्यातील फलटणमध्ये प्रथमच दुर्मीळ ब्लॅक-नेपड मोनार्क जातीचा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीमधील वन्यजीव अभ्यासक रवींद्र लिपारे, गणेश धुमाळ आणि साकेत अहिवळे यांना पक्षी निरीक्षण करत असताना … Read more