साताऱ्यात रानडुकराच्या शिकारीची बंदूक वनविभागाच्या हाती

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या हद्दीवर महादरीचे जंगलात रविवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सातारा शहराजवळ महादरे संरक्षण राखीव या जंगलात रानडुकराच्या शिकारीत वापरलेली बंदूक वनविभागाच्या हाती लागली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच जंगलात रविवारी काही पोलीस कर्मचारी सरावाचा भाग म्हणून महादरेच्या पायऱ्या चढून यवतेश्वर नजीकच्या पठारावर निघाले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक रानडुक्कर पोलिसांना … Read more

कोयनेच्या प्रलयकारी भूकंपास तब्बल 56 वर्षे पूर्ण, ‘त्या’ आठवणींनी आजही उडतो थरकाप…

Earthquake Koyna jpg

पाटण प्रतिनिधी । 11 डिसेंबर 1967 रोजीची ती रात्र ही काळरात्र ठरेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील वाटले नसेल कारण बरोबर आजच्या दिवशी 56 वर्षांपूर्वी कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंप आला होता. या दिवसाला आज 56 वर्षे पूर्ण होत आहेत. 11 डिसेंबर 1967 च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील … Read more

अन् वन मजुरांनी उपसले आंदोलनाचे शस्त्र; ‘या’ महत्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी केले आमरण उपोषण

Satara News 9 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य सरकारच्या वन विभागाअंतर्गत वन मजुरांकडून अनेक माके केली जातात. शिवाय त्याच्याकडून काही मागण्या देखील केल्या जातात. मात्र, त्या मागण्यांकडे विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी तसेच वनमजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी मंत्रालयीन दालनातील फाईल मंजुरी मिळावी, … Read more

गमेवाडीच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या बछड्याचे मादीशी पुनर्मिलन

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । गमेवाडी, ता. कराड येथील उत्तम जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना काल शनिवारी घडली होती. यावेळी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बछड्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले होते. दरम्यान, रात्री या बछड्याचे व आईचे पुनर्मिलन घडवून आणले. त्यांच्या या भेटीची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. याबाबत अधिक … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका…

Karad Leopard News 20231202 131745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गमेवाडी येथील एका विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वन विभागाकडून बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी … Read more

महाबळेश्वर देवस्थानच्या 166 एकर मिळकतीबाबत न्यायालयाचा महत्वाचा आदेश; वनविभागाला मोठा धक्का !

Mahabaleshwar News 20231103 155622 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | श्रीक्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची अनुमाने 166 एकर मिळकत 2 मासांत मोकळी करून माघारी देण्याचे आदेश महाबळेश्वर येथील दिवाणी न्यायालयाने वनविभागाला नुकताच दिला आहे. थकबाकीची रक्कमही 6 टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिल्याने वन विभागाला मोठा धक्का बसला आहे. महाबळेश्वर येथील सर्वे क्रमांक 52 आणि 65 मधील 166 एकर मिळकत वनविभागाने वर्ष 1943 मध्ये 60 … Read more

CRIME NEWS : व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

Karad Bhel Fish News 20230926 105910 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह 3 जणांवर वन विभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत 6 कोटी रुपये इतकी आहे. महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, … Read more

कराडच्या भरवस्तीत सापडले स्टार कासव; वन विभागाकडून गोपनीय पध्दतीने तपास सुरू

Karad Star Turtle News 20230917 120839 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षिक वर्गात समावेश असलेले दुर्मिळ प्रजातीचे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कराड शहरातील रविवार पेठेसारख्या भरवस्तीत सापडले आहे. हे कासव लहानपणापासून घरात पाळले असल्याचा आणि जाणुनबुजून सोडले असल्याचा संशय आहे. या कासवाबद्दल मानद वन्यजीव रक्षक अथवा वन विभागाला माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, … Read more

जखिनवाडीत विहिरीत पडलेल्या ‘त्या’ 2 बिबट्याच्या बछड्यांची वन विभागाने घडवली आईसोबत पुनर्भेट…

Karad News 20230904 121322 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांची आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वनविभागास यश आले आहे. वनविभागाकडून रविवारी मध्यरात्री 1 वाजता रेस्क्यू ऑपरेशन राबविलेल्या मोहिमेचे दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना … Read more

जखिणवाडीत 2 तासांच्या रेस्क्यू मोहिमेतून विहीरीत पडलेल्या 2 बिबट्याच्या बछड्यांची सुखरूप सुटका

Karad Lepard News 20230902 154902 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्याना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका मागून एक अशा 2 बिबट्याच्या बछड्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

वराडेत 3 बिबट्यांचे पुन्हा दर्शन; CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard News 20230818 100408 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वराडे गावात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले होते. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेले 3 बिबटे गावात फिरत असल्याचे पुन्हा CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे, ता. कराड येथील गावात मागील … Read more

उत्कृष्ट कार्याबाबत कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांचा कोल्हापुरात वन विभागातर्फे सन्मान

Forest Department Wildlife Warden Rohan Bhate jpg

कराड प्रतिनिधी । वन क्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणणे व वनसंरक्षण, वनसंवर्धन, जनजागरण यामध्ये कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मंगळवारी स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात वन विभागाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात मंगळवारी वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्र मधील … Read more