विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार द्यावी – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

Satara Farmar News 1

सातारा प्रतिनिधी । कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजार मुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. … Read more

नदीकाठची शेती जिरायत असते की बागायत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजितदादांनी प्रांताधिकाऱ्यांना झापलं…

Karad News 20241008 215814 0000

कराड प्रतिनिधी | टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या नदीकाठच्या शेतीची जिरायत नोंद घेऊन संपादनाचा कमी मोबदला निश्चित केल्याची बाब सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी वाई दौऱ्यावेळी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजितदादा चांगलेच संतापले. कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दादांनी फोनवरून झापलं. सुपने परिसरातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित टेंभू उपसा योजनेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील दोन्ही बाजूची शेती बाधित झाली आहे. टेंभूपासून … Read more

शेळी-मेंढी गटासाठी मिळतेय ‘इतके’ टक्के अनुदान; एकदा अर्ज केल्यास 5 वर्षात कधीही होते निवड

Satara News 20240929 142821 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील बहुतांशी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी-मेंढी तसेच गाय- म्हशीचे पालन करतात. यामध्ये राज्य शासनही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतून शेळी-मेंढी गटासाठी ७५ टक्के अनुदान देत आहे. यात एकदा अर्ज केला की पाच वर्षांत कधीही निवड होत असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर … Read more

वीज ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी मोहिम राबवा : आमदार दीपक चव्हाण

Satara News 20240913 154620 0000

सातारा प्रतिनिधी | खरिपासह ऊस, कापूस पिकांना पाण्याची जरुरी असताना वीज ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला असून वीज वितरण कंपनी आणि पोलिस यंत्रणेने ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत. वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. श्रीमंत … Read more

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल – उपसंचालक महेंद्र ढवळे

Satara News 20240905 194956 0000

सातारा प्रतिनिधी | रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले. … Read more

फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्याकडे

Phalatan News 20240904 191701 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी ढोले यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी … Read more

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । ग्रामपंचायत विभागाकडे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी 237 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 95 प्रस्तांवाना शेतकऱ्यांची संमती मिळणे बाकी आहे. ज्या कामांना अद्यात शेतकऱ्यांची संमती नाही त्यांची संमती घेण्याचे काम 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावावे यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त आदेश काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. पाटण तालुक्यातील मातोश्री … Read more

पावसाळ्यातील जनावरांच्या उध्दभवणाऱ्या आजारांबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘पशुसंवर्धन’कडून महत्वाचे आवाहन

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून … Read more

एक रुपयाच्या पीक विम्यासाठी उरले फक्त 48 तास; सातारा जिल्ह्यात ‘इतके’ लाख झाले शेतकरी सहभागी

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी केली मृद तपासणी!

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । शेत जमिनीतील माती तपासल्यानंतर अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार समतोल व योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन पीक उत्पादनात वाढ करता येते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरत असून जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. २०२३-२४ वर्षात १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृद तपासणी केली आहे. तर साडेआठ हजार शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वाटप झाले आहे. जमिनीचे अनेक प्रकार … Read more

मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

साताऱ्यात विद्यार्थी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर; घेतले शेतीचे धडे

Satara News 20240703 193132 0000

सातारा प्रतिनिधी | कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून पिकलेले अन्न वाया न घालविण्याची सवय लागणे यांची जाणीव मुलांना या वयातच होणे ही काळाची गरज ओळखून प्रतिवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती व शेती संबंधित सर्व उत्पादन प्रक्रियांची माहिती … Read more