बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी पावसाळा जवळ आला की, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरे, बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यांना दर्जेदार आणि उत्तम प्रतीची बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून देखील अनुदान तत्वावर बियाणांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली जाते. अशीच तयारी यंदा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

वनवासवाडी, कोळेकरवाडी शिवारात रानगव्यांच्या कळपांचा वावर; पिकांचे नुकसान

Wild Cattle News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान

20240428 163923 0000

सातारा प्रतिनिधी | दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ हजार २६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ८९ लाख दूधाचे अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत ८५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व अन्य तांत्रिक अडचणी दूर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पाणीप्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला थेट आंदोलनाचा इशारा

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी खंडाळा तालुक्यात पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे. येथील धोम-बलकवडीच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी तोंडी आदेश देखील दिले. मात्र, अद्याप पाणी न सोडले नाही. त्यामुळे आज शनिवारी पाणी सोडले नाही तर उद्या रविवार, दि. २१ रोजीपासून खंडाळा तहसील कार्यालयासमोर … Read more

जावळीत शेतजमिनीच्या रस्त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240403 110940 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा … Read more

कोचरेवाडीत भीषण आगीत 8 गवताच्या गंजी खाक; 3 शेतकऱ्यांचे 1 लाख 35 हजारचे नुकसान

Patan News 13 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या कोचरेवाडी येथील आठ गंजींना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमध्ये 3 शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाख 35 हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यापासून सुमारे 32 किमी अंतरावर डोंगरमाथ्यावर कोचरेवाडी हे गाव वसले आहे. गावात साधारण 109 कुटुंबे राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने … Read more

वाई पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत बांबू लागवड केलेल्या शेतीची पाहणी

Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाचे माध्यमातून तालुक्यातील लगडवाडी येथील शेतकरी शरद मोरे यांच्या वतीने बांबू लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरद मोरे यांना मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये ४५ हजार रुपये इतके मजुरी मिळाली. संबंधित शेतकऱ्याच्या बांबू लागवड केलेल्या या ठिकाणची वाई पंचायत समितीची कृषी विभागाचे विस्तार … Read more

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 2024 03 16T181202.463 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली … Read more

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास कराडातून शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा

Karad News 70 jpg

कराड प्रतिनिधी । दिल्लीत शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास पाठिंबा देत कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा पणन विभागाच्या प्रस्तावित कायद्याला शेतकऱ्याच्या वतीने विरोध करण्यात आला. कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनस्थळी कराड शेती उत्पन्न … Read more

जिल्ह्यात दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; ‘स्वाभिमानी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील … Read more

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता

Satara News 2024 03 04T114814.013 jpg

सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन … Read more

जिल्ह्यातील 3 शेतकरी करणार परदेशातील शेतीची पाहणी; लॉटरी पद्धतीने झाली निवड

Satara News 20240220 144233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती तसेच तेथे शेती कशी केली जाते, अवजारे कोणती आणि त्याचा कसा वापर केला जातो, याची माहिती होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने परदेश अभ्यास दौरा नियोजित केला असून यासाठी सातारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने … Read more