कराड तालुक्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Karad News 20240924 141654 0000

कराड प्रतिनिधी | येत्या १५ दिवसात बाधीत जमिनींचा मोबदला न मिळाल्यास सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू प्रकल्प बाधीत संतप्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन देखील काल प्रशासनास दिले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाधीत जमिनींचा सर्वे होऊन १३ वर्षे उलटून गेली मात्र अद्याप या जमिनींचा … Read more

शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Satara News 20240924 105322 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने साडे सात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचे वीजबील माफ केलेले आहे. यामुळे सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पण, साडेसात अश्वशक्तीच्यावर शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे त्यांनाही न्याय द्यावा. त्यांची चिंता दूर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले … Read more

बांबू लागवडीसाठी पाटण तालुक्यात 1 हजार 334 प्रस्ताव प्राप्त

Bamboo News 20240923 144301 0000

पाटण प्रतिनिधी । दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. शाश्वत विकासामध्ये बांबूचे महत्त्व आणि जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि समुदायांसाठी त्याचे अनेक फायदे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक बांबू दिनानिमित्ताने राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे पाटण तालुक्यात बांबू लागवडीसाठी शेतकरी व प्रशासनाने आघाडी घेतली आहे. बांबू लागवडीसाठी पाटणच्या विविध शासकीय … Read more

जिल्हयातील सात तालुक्यांतील 2083 शेतकऱ्यांना पावसाचा फटका

Satara News 20240922 210536 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे सात तालुक्यांमधील २ हजार ८३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. सुमारे ५२८.३९ हेक्टर बागायत व जिरायत क्षेत्रावरील खरिप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे. फलटण तालुक्यात १ हजार १३३ शेतकऱ्यांचे ४३४.३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप हंगामात कमी … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Satara News 20240922 164242 0000

सातारा प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करण्यासाठी देण्यात आली आहे. दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत शासनाची मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी मुदतीत आधार प्रमाणीकरण व वारस नोंद करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे. महात्मा फुले शेतकरी … Read more

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Satara News 20240910 110758 0000

सातारा प्रतिनिधी | पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत … Read more

नवीन विहिरीस शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये; बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Farmar News 20240909 104810 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यानुसार आता राज्य शासनाने अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती मौजना निकषात सुधारणा केली आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरीस चार लाख आणि दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे; जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

Satara News 20240905 175857 0000

सातारा प्रतिनिधी | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील 629 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ अंतर्गत रु. 50 हजार पर्यंत लाभासाठी सातारा जिल्हयातील … Read more

शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांकडून बेलवडे नजीक महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तास वाहतूक ठप्प

Karad News 20240831 082427 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून पंधरा दिवसात सर्व खड्डे मुजवण्यात येतील, अशी लेखी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खड्डेे कायम असून अपघातांची मालिका कायम असल्या कारणाने आक्रमक झालेल्या बेलवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी महामार्गावर उतरून अचानकपणे रास्तारोको केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. घटनास्थळी तळबीड पोलिस ठाण्याचे … Read more

रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता द्या, अन्यथा रेलरोको; ‘रयत क्रांती’चा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा

Karad News 34

कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे … Read more

पाटण तालुक्यात अपघात विम्याचे 23 प्रस्ताव मंजूर; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२३- २४ व २०२४- २५ या आर्थिक वर्षात एकूण २३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे एकूण ४६ लाख रुपये अनुदानाचा लाभ संबंधित मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला आहे. पाटण तालुक्यात गत व चालू आर्थिक वर्षात रस्ते अपघात, पाण्यात बुडून, … Read more

सरसकट आले खरेदीच्या निर्णयानंतर काढलं परिपत्रक; जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना होणार फायदा

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी, अशा सूचना सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपल्याकडील अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडत्यांना कराव्यात, नवीन व जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये, असे परिपत्रक राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पणन संचालनालयाच्या वतीने … Read more