सोयाबीन खरेदी केंद्रांना ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ; सहकार विभागाच्या अवर सचिवांचे पत्र

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत आजपर्यंत देण्यात आली होती. मात्र, त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे. मात्र, बाजारपेठेत ऐन दीपावलीच्या … Read more

फलटणला सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र झाले सुरू; 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

Phalatan News 2

सातारा प्रतिनिधी । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फलटण येथे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हंगाम २०२४-२५ मध्ये सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नावनोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात 18 हजार हेक्‍टरवर रब्‍बीची पेरणी

Satara News 20241103 101656 0000

सातारा प्रतिनिधी | मॉन्सूनोत्तर पाऊस थांबल्‍याने आता जिल्ह्यात शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या पेरणीची गडबड सुरू झाली. यंदा या हंगामात जिल्ह्यात दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, आतापर्यंत १८ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे, तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पावसाचा कालावधी दिवाळीपर्यंत सुरू … Read more

फलटणमध्ये शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मजुरांमध्ये मतदान जनजागृती

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी | ‘स्वीप’अंतर्गत फलटण, जिल्हा सातारामार्फत घिगेवाडी, ता. कोरेगाव येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतमजुरांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत महत्त्वाचे असून बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याबाबत स्वीप नोडल अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी … Read more

जावळीत पावसाचा पिकांना फटका; सोयाबीन, भात पिकांचे मोठे नुकसान

Crop News

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. करहर, कुडाळ परिसरातील खर्शी, हातगेघर, महू, दापवडी, बेलोशी, काटवली, रुईघर आंदी परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीनसह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली … Read more

परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले; नुकसानीमुळे शेतकरी धास्तावला

Satara News

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजल्याने नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असून, … Read more

कराड तालुक्यातील वराडेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Karad News 20241020 224315 0000

कराड प्रतिनिधी | शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर ऊसातून आलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे येथे घडली. यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावच्या पश्चिमेस वारसुळे नावच्या शिवारात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे येथील शेतकरी दीपक शिवाजी साळुंखे शनिवारी १९ रोजी … Read more

ऊस दरासाठी बळीराजा संघटना उद्या करणार कराड तहसीलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी आंदोलन

Karad News 67

कराड प्रतिनिधी । ऊस दरासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयात जाऊन उद्या दि. ९ रोजी खर्डा भाकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश दादा शेवाळे, जिल्हाध्यक्ष … Read more

साखर कारखानदारांनी पहिली उचल चार हजारांवर द्यावी; साताऱ्यात शेतकरी संघटनांची बैठकीत भूमिका

Satara News 20241008 075902 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी. यासाठी २१ आॅक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा. अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. त्यासाठी … Read more

जिल्ह्यातील ऊस आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाची बैठक

Satara News 20241007 093737 0000

सातारा प्रतिनिधी | दसऱ्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती … Read more

शेतकऱ्यांनो ई-केवायसी केला का? कृषी विभागाने केलंय महत्वाचं आवाहन

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीकांची ई पीक पाहणी केली होती, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तरी अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी आणि अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी … Read more

सुपनेमधील टेंभू प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत जमीन मोबदला प्रक्रियेविषयी चर्चा

Karad News 20240927 160708 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व प्रांताधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्याच्या इशाऱ्यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुपने येथे जाऊन बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन जमीन मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेविषयी चर्चा केली. सुपने व पश्चिम सुपने परिसरातील टेंभू प्रकल्पबाधित जमिनीचे सर्वेक्षण होऊन तेरा वर्षे उलटून … Read more