मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली सातारा लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक

Satara News 2024 02 26T182112.938 jpg

सातारा प्रतिनिधी । सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबतचा आढावा अपर मुख्यसचिव तथा मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी आज घेतला. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आज पार पडली. यावेळी आठही विधानसभा मतदार संघ निहाय जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करणेत आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची झाली बदली

Satara News 2024 02 24T190917.496 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या विभागवार बदल्या केल्या जाय आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 03T192505.098 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लक्षपूर्वक व काळजीपूर्वक दिलेल्या सूचना समजून घ्याव्यात व त्याप्रमाणे आपापल्या नेमून दिलेल्या जबाबदा-या पार पाडाव्यात असे निर्देशही दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज कायदा … Read more

नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घ्या : जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 01T164009.905 jpg

सातारा प्रतिनिधी । 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असून त्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, सरपंच, बीएलओ यांची मदत घ्यावी. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावे, नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व नोडल अधिकारी, प्रांताधिकारी … Read more

अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची … Read more

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात उद्या विविध कार्यक्रम

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या गुरुवारी दि. २५ रोजी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी … Read more

सातारा जिल्ह्यातील लाखो मतदार वगळण्याची प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 35 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यांत लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहे. मतदार नोंदणीसोबत मयत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 1 लाख 50 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून तितक्याच मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक मतदार अर्ज सातारा जिल्ह्यात भरुन घेण्यात आले … Read more

नावे समाविष्ट करण्यासाठी सुमारे 6 हजार अर्ज प्राप्त : सुधाकर भोसले

Satara News 22 jpg

सातारा प्रतिनिधी । छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सर्व दुरुस्त्यासह अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना असल्यास सादर कराव्यात असे भोसले यांनी आवाहन करीत यावेळी … Read more

नवयुवा मतदारांच्या नाव नोंदणीसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांवर भर द्या – विभागीय आयुक्त सौरभ राव

Saurabh Rao Satara News jpg

कराड प्रतिनिधी । विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रम, थेट महाविद्यालयांशी समन्वय आदी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक पार पडली. … Read more

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे : जितेंद्र डूडी

Satara News 20231213 105440 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट याबाबतची संपूर्ण माहिती करून घेण्याचे व पूर्व तयारीचा भाग म्हणून स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक; केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयार आढावा बैठक आज पार पडली. यावेळी निवडणुकीच्या काळात महसूल व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे तसेच या दोन्ही विभागांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आणि पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायती आणि 172 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी आज जाहीर केला. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक … Read more