पाण्याचा अंदाज न आल्याने मराठवाडीच्या जलाशयात मुलाचा बुडून मृत्यू

Crime News 20241121 091457 0000

पाटण प्रतिनिधी | मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील उमरकांचन गावाजवळ घडली. ओंकार रमेश भिंगारदेवे (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत मंगळवारी दुपारी गावाजवळच्या वांग … Read more

साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

Crime News 20240726 085117 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जावळी महाबळेश्वर वाई तालुक्यातील अनेक साखरपुल पाण्याखाली गेली असून ओढ्यांना देखील पूर आला आहे. धनावडे वस्ती (ता. वाई) येथील ३८ वर्षीय महिला किवरा ओढ्याच्या पुरात वाहून गेली आहे. शिल्पा प्रकाश धनावडे, असं महिलेचं नाव असून तिचा अद्याप शोध लागलेला नाही. मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी … Read more

केळवली धबधब्यात बुडालेल्या कराडच्या सैदापूरातील युवकाचा मृतदेह सापडला

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील केळवली भागात फिरण्यासाठी गेलेला कराड तालुक्यातील सैदापूर येथील २२ वर्षीय ऋषिकेश कांबळे हा युवक धबधब्यात पाय घसरून पडल्याची घटना आठवडाभरपूर्वी घडली होती. यानंतर संबंधित युवकाचा शोध घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या ऋषिकेशचा मृतदेह आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या युवकांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढला. याबाबत … Read more

कोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी; एकजण बुडाला तर दोघे पोहत बाहेर आले

Patan News 20240418 215729 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला, मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. कामाची पाहणी … Read more

धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

20240403 043948 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता. वाई) येथे ही दुर्दैवी घटना घडली. उत्तम सहदेव ढवळे व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत. धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे. त्यामुळे … Read more

अभ्यासासाठी गेलेल्या दोन मुलींचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

Mahabaleshwar News 20240401 124222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात नेल्यावर मृत घोषित करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या … Read more

कोयना नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

Karad News 54 jpg

कराड प्रतिनिधी । कोयना नदीतील आगाशिवनगर हद्दीतील पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर पार्टीसाठी गेलेला एक इसम कोयना नदीपात्रात बुडल्याची घटना बुधवारी (दि. २८) ही घटना घडली होती. या बुडालेल्या इसमाच्या मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळून आला. दादासाहेब आर्जून … Read more