जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

अखेर तारळी धरणाचे पाणी सोडले, लवकरच मसूर विभागात होणार दाखल

Karad News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी धरण उभारणीस 1995 साली मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे काम 2010 साली पुर्ण झाले. या धरणामध्ये 5.83 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1.83 टीएमसी पाणी नदीवाटे शेतीसाठी व पिण्यासाठी वापरात येत होते. उर्वरीत 4 टीएमसी पाणी वापरात येत नव्हते. दरम्यान, मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे … Read more

पाणीप्रश्न संवाद मेळाव्यात औंधसह 20 गावांना 3 वर्षांत पाणी प्रश्न सुटण्याबाबत चर्चा

Khatav News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक प्रकारचे मेळावे होतात. मात्र, जिल्ह्यात इतिहासात पहिलाच खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा इतिहासात प्रथम खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा खटाव तालुक्यातील औंध येथे नुकताच पार पडला. तालुक्यातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना खुले निमंत्रण दिले होते. या मेळाव्यास उपस्थित राहत आमदार … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील भागात वाढली दुष्काळाची दाहकता; टँकरने पाणीपुरवठा सुरु

Satara News 2024 03 20T141733.298 jpg

सातारा प्रतिनिधी । नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खंडाळा तालुक्यात १ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात पूर्वे आणि पश्चिम भागात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे … Read more

जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 2024 03 16T181202.463 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली … Read more

तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

कोरेगाव उत्तरमधील ‘या’ गावांत पाणी टंचाई; ग्रामस्थांसह महिला आक्रमक

Koregaon North News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके या चार गावांच्या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. १४ रोजी नायगाव येथील महिलांनी ग्रामस्थांच्या वतीने गावात हंडा मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच … Read more

जिल्ह्यातील धरणात पाण्याचा ठणठणाट; ‘इतके’ टक्के आहे पाणीसाठा

Satara News 72 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी … Read more

पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more