साताऱ्याचा सज्जनगड हलगी-तुतारीचा निनादासह मशालोत्सवाने उजळला

Satara News 20241103 120201 0000

सातारा प्रतिनिधी | फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांनी घेतला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा वसा

Satara News 25 1

सातारा प्रतिनिधी । देशभरामध्ये सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि आतिषबाजीमध्ये दिवाळी साजरी केली जाते. मात्र सध्याच्या हवामानाच्या स्थितीमुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. यावर आता सातारा जिल्ह्यातील एका गावाने स्युत्य निर्णय घेतला आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे चिंचनेर वंदन गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शूरवीर सैनिकांची नगरी … Read more

विद्यार्थ्यांकडून आकाश कंदीलातून मतदान जनजागृतीचा संदेश; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेतील 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील … Read more

दिवाळीत फटाके उडवण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी केली महत्वाची अधिसुचना जारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून नुकतेच आदेश पारित करण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारु काम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे … Read more

साताऱ्यात फटाके विक्रीच्या परवानगीवर निघाला तोडगा

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । दिवाळी तोंडावर आली असताना फटाके विक्रीची परवानगी मिळत नसल्याने फटाके विक्रेते हतबल झाले होते. मात्र, गुरुवारी तहसीलदारांनी फटाके विक्रीचा परवाना देण्याचे मान्य केल्यानंतर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साताऱ्यातील माची पेठेमध्ये काही दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दारूचा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर चौघे जण गंभीर जखमी … Read more

साताऱ्यातील प्रतापगंज पेठेत फटाक्यांमुळे घराला लागली आग; परिसरात धुराचे लोट

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । दिवाळी सणामुळे सर्वत्र फटाक्यांची दुकाने लागलेली आहेत. तर अनेकजण फटाके खरेदी करून ते घरामध्ये ठेवत आहेत. मात्र, फटाके ठेवताना त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ती घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशीच घटना साताऱ्यातील मध्यभागी असणाऱ्या प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री घडली. येथील SBI बँकेसमोरील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे घराला आग … Read more

सातारा जिल्ह्यातील ड्रग माफियांच्यावर कारवाई करा; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात ड्रगची विक्री कॉलेज परिसरात होत असावी. बंटागोळीसारख्या अंमली पदार्थ साताऱ्यात पानटपऱ्यांवर मिळतात याकडे फुड अॅण्ड ड्रगचे लक्ष नाही. त्यांचे लाड बंद करा. गुटखा विक्रेत्यांची पाळेमुळे खणून काढा, अशा शब्दात फुड अॅण्ड ड्रगच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. … Read more